अलिबागमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, हायकोर्टात याचिका

अलिबागमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, हायकोर्टात याचिका

अलिबागमध्ये किती बांधकामे अनधिकृत आहेत याची माहिती शपथपत्रावर सादर करावी. या बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

60 वर्षीय मेधा वैद्य व अन्य यांनी अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. नागाव येथे किती बांधकामे अवैध आहेत याची माहिती वैद्य यांनी माहिती अधिकारात मागवली होती. येथे 250हून अधिक बांधकामे बेकायदा असल्याची माहिती तलाठी कार्यालयाने वैद्य यांना दिली. त्याचा तपशील याचिकेला जोडण्यात आला आहे. या याचिकेवर येत्या काही दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण…

वैद्य यांचा नागाव येथे भूखंड आहे. त्यांचा तेथील जयवंत नाईक यांच्यासोबत वाद सुरू आहे. नाईक यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला. वैद्य यांचे बांधकाम पाडण्याचे व तेथील रस्ता वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती अर्जात करण्यात आली होती. त्याची दखल घेत बांधकाम पाडण्याचे अंतरिम आदेश तहसीलदार कार्यालयाने दिले. हा वाद प्रलंबित असताना काही बांधकामांवर कारवाई झाली, असा दावा वैद्य यांनी याचिकेत केला आहे.

नाईक यांचे बांधकाम बेकायदा

नाईक यांचेच बांधकाम बेकायदा आहे. त्यावर कारवाई करावी, अशी विनंती तहसीलदार कार्यालयाकडे करण्यात आली. त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. उलट नाईक यांना अवैध बांधकामाचे शुल्क भरण्यास सांगण्यात आले. नाईक यांच्या अवैध बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी वैद्य यांनी याचिकेत केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;