खड्डा, चर बुजवल्यानंतर दोन तासांत वाहतूक, मजबूत रस्त्यांसाठी पॉलिमर काँक्रीट, आयआयटी तज्ञांचा पालिकेला सल्ला
मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी रस्त्यांची देखभाल, चर बुजवण्यासाठी ‘आयआयटी’ मुंबईच्या सल्ल्यानुसार ‘पॉलिमर’ काँक्रीट वापरण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाने दुरुस्ती केलेल्या रस्त्यावरून दोन तासांत पूर्ण क्षमतेने वाहतूक करणे शक्य होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण कामांची दर्जेन्नती कामांमध्ये येणारी आव्हाने, शंकांचे निरसन या सर्व बाबींच्या अनुषंगाने महानगरपालिका अभियंत्यांसोबत विचारमंथन करण्यासाठी पवई येथील आयआयटी, मुंबई येथे एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. यामध्ये काँक्रीटीकरण प्रकल्प दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी महानगरपालिका अभियंत्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. तांत्रिकदृष्टय़ा कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी काँक्रीट रस्त्याचा आराखडा, तंत्रज्ञान, गुणवत्ता चाचण्या, हवामान यांसह काँक्रीट रस्त्याला पडणाऱया भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना याविषयी पालिका अभियंत्यांनी कालानुरूप प्रशिक्षण घेऊन अद्ययावत राहिले पाहिजे, गुणवत्ता नियंत्रणासाठी अधिक सक्षमपणे नियोजन केले पाहिजे, असा सूर महानगरपालिका अभियंता आणि रस्तेविषयक तज्ञांच्या कार्यशाळेत उमटला. आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन केले होते. 155 हून अधिक पालिका अभियंते तसेच सल्लागार पंपन्यांच्या अभियंत्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.
असे आहे जिओ पॉलिमर तंत्रज्ञान
जिओ पॉलिमर तंत्रज्ञानात खड्डय़ाच्या जागीच मटेरियल तयार करून तातडीने खड्डा भरला जातो. सिमेंट रस्त्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. दोन तासांत हे मटेरियल सुकल्यानंतर वाहतूक सुरू करता येते. ‘हेवी वेट’ वाहनांची वाहतूक असणाऱया रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे. एक चौरस मीटर खड्डा भरण्यासाठी 5 हजार रुपयांचा खर्च येतो.
अशी आहेत आव्हाने
मुंबईत सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे करताना सिमेंट काँक्रीट आणि खडी वाहून आणणारी वाहने तसेच रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट यामधील अंतर, मुंबईतील वाहतूककाsंडी, हवामान यासारखी विविध आव्हाने असल्याचे अभियंत्यांनी नमूद केले. वाहतूककाsंडी यासारखे घटक कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात आले. रस्त्याची कामे करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मिळणारी परवानगी तसेच मुंबई महानगरात असणारे ’मॅनहोल्स’चे जाळे हेदेखील आव्हाने असल्याचा अभिप्राय अभियंत्यांनी नोंदविला.
बैल मिळाले नाहीत; शेतकऱ्याने औताला भाऊ अन् मुलाला जुंपले!
शेती आतबट्टय़ाचा धंदा असल्याचे बोलले जाते. बागायती असो की कोरडवाहू शेतकऱयांची परवड ठरलेली. कधी निसर्ग, कधी व्यापारी तर कधी सरकारकडून… हिंगोली जिल्हय़ाच्या वसमत तालुक्यातील शिरळी येथील हे छायाचित्र सरकार, समाजाच्या डोळय़ात झणझणीत अंजन घालणारे आहे. दीड एकराचे धनी असलेले बालाजी पुंडगे यांनी नांगरण्यासाठी बैलजोडी उसनवारीवर न मिळाल्याने मुलगा सचिन आणि भाऊ मनोहर यांनाच औताला जुंपले! सोयाबीन आणि हळदीचे पीक ते घेतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List