अखेर त्या महिलेची ओळख पटली
गेल्या आठवडय़ात शिकाऊ चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत पावलेल्या वृद्ध महिलेची ओळख पटवण्यात कांदिवली पोलिसांना यश आले आहे. फुलमती जैस्वार असे त्या महिलेचे नाव आहे.
अपघातप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद करून राजेंद्र गुप्ता आणि सुरेंद्र गुप्ताला अटक केली होती.
फुलमती या कांदिवलीच्या पोयसर परिसरात राहत होत्या. त्या रोज जरी मरी माता मंदिरात जात असायच्या. गेल्या शुक्रवारी त्या घराबाहेर पडल्या. मंदिराकडे जात असताना शिकाऊ चालकाने त्यांना धडक दिली. त्या धडकेत फुलमती गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती समजताच कांदिवली पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी फुलमतीला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला फुलमतीची ओळख पटत नव्हती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला.
फुलमती या घरी न आल्याने तिच्या पतीने समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. फुलमतीच्या हातावर गोंदण असल्याने तिची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. फुलमतीच्या अपघाती मृत्यूची माहिती तिच्या मुलाला कळवण्यात आली. शवविच्छेदन करून तिचा मृतदेह मुलाच्या स्वाधीन केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List