ICC T20 world Cup – टीम इंडियाचे सेमी फायनलमध्ये स्थान निश्चित, ऑस्ट्रेलियाला धूळ चारली

ICC T20 world Cup – टीम इंडियाचे सेमी फायनलमध्ये स्थान निश्चित, ऑस्ट्रेलियाला धूळ चारली

टी-20 विश्वचषक 2024 या स्पर्धेतील सुपर 8 च्या लढतीत हिंदुस्थानी संघाने जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवला आहे.हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला असून सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे.रोहित शर्माच्या 92 धावांच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने चांगली कामगिरी करत 205 धावांचा डोंगर उभारला. हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियन संघाला 181 धावांवर रोखले आणि अशा प्रकारे हिंदुस्थानी संघाने सुपर-8 चे तिन्ही सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात T20 विश्वचषक 2024 सुपर 8 सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर रोहित शर्माच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने 20 षटकात 5 गडी गमावून 205 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी 206 धावा करायच्या होत्या, मात्र त्यांना विजयाचे लक्ष्य गाठता आले नाही आणि 24 धावांनी हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. हिंदुस्थानी संघाने टी20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक दिली. हिंदुस्थानी संघाने सुपर-8 चे तिन्ही सामने जिंकले आणि गट एकमध्ये 6 गुणांसह पहिले स्थान पटकावले. आता उपांत्य फेरीत हिंदुस्थानचा 27 जून रोजी इंग्लंडशी सामना होणार आहे.

या सामन्यात हिंदुस्थानचा सलामीवीर फलंदाज विराट कोहली शून्यावर बाद झाला. रोहित शर्माने 19 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात ऋषभ पंतने 14 चेंडूत 15 धावांची खेळी केली. रोहित शर्मा 92 धावा करून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 31 धावांची खेळी केली. शिवम दुबे 22 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या 27 धावांवर नाबाद राहिला तर रवींद्र जडेजा 9 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टेनिसने 2-2 तर जोस हेझलवूडने एक विकेट घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;