जामगे देवाचा डोंगर वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर कोसळली दरड, वाहतूक खोळंबली
आधीच महसुली गावाच्या प्रतिक्षेत असलेल्या जामगे देवाचा डोंगर वस्तीच्या समस्या काही केल्या पाठ सोडत नाहीत. अशाच एका समस्येने अतिवृष्टीच्या आपत्तीत डोके वर काढले आहे. चिचाळी मार्गे जामगे या मुळ गावातून जामगे देवाचा डोंगर वस्तीकडे जाणा-या मार्गावर ठिक ठिकाणी दरडी कोसळत असल्याने त्याचा परिणाम हा वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरळीत वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी उद्भवलेली समस्या तातडीने दुर करण्यासाठी पाऊले उचलली पाहीजेत.
शनिवारी दापोली तालूक्यातील जामगे गावाच्या हद्दीतील धरणाजवळून जाणारा खेड जामगे शिवतर सोवेली प्रजिमा 12 नोंदीच्या नावाचा रस्ता खचल्याची घटना ताजीच असताना आता जामगे देवाचा डोंगर लोकवस्तीकडे जाणा-या रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने जामगे देवाचा डोंगर येथे राहणा-या रहीवाशांच्या प्रवासासाठीची मोठीच अडचण झाली आहे. मग नेहमी चीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे पावसाळयाचा हंगाम सुरू झाला की डोंगर दरींच्या चढ उतारातून जामगे देवाचा डोंगर वस्तीकडे जाणा-या या मार्गावर दरवर्षीच दरडी कोसळून अनेकदा मार्ग बंद पडण्याच्या घटना घडतात तसे शनिवार पासून गेेले तीन दिवस या मार्गावर दरडी कोसळण्याचे सत्र सुरू आहे.
रस्त्यावर कोसळणा-या दरडींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. कारण जामगे देवाच्या डोंगर येथील लोकवस्तीतील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असला तरी वाडीतीलच नव्हे तर चारही वाडयांमधील लोक प्रामुख्याने दुधाचा व्यवसाय करतात त्यामुळे दररोज त्यांना नित्यनेमाने सकाळी उठून वेळेत दुध घेवून पालगड येथील दुध डेरीवर दुध घेवून यावे लागते. मात्र रस्ता दरडी कोसळण्यांमुळे बंद होत असल्याने वाहनांशीवाय जामगे गावात पायपीट करत 5 किमी अंतर देवाच्या डोंगर येथून चालत यावे लागते यात त्यांच्या वेळेचा अपव्यय होत आहे शिवाय जाताना उभा चढ चढून दमछाक करीत आपल्या वस्तीकडे जावे लागते तसे येथील माध्यमिक तसेच महाविदयालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतीही सबब न सांगता ये जा करावी लागत आहे त्यामुळे या समस्येवर कायम उपाय योजना करावी अषाप्रकारची मागणी जामगे देवाचा डोंगर येथील काशिनाथ झोरे या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List