कुत्र्याच्या खाण्यावरून वाद पेटला ; मुलाने वडिलांवर केले सूऱ्याने वार
कुत्र्याच्या खाण्यासाठी कोंबडीचे पाय आणण्याच्या कारणावरून घरात वाद घालून वडिलांवरच मासे कापण्याच्या सूऱ्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी देवगड पोलिसांनी जामसंडे सहकारनगर येथील करण रविकांत पारकर व 31 या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. ही घटना 23 जून रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास जामसंडे सहकार नगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामसंडे सहकार नगर येथे राहत असलेल्या रविकांत रघुनाथ पारकर 64 यांच्या लहान मुलगा करण पारकर यांनी कुत्र्यांना खाण्यासाठी कोंबडीचे पाय आणायचे आहेत ते घेऊन ये असे मोठा भाऊ सिद्धार्थ याला सांगितले. परंतु त्यांने ते संध्याकाळी घेऊन येतो असे सांगितल्यावर त्याचा राग येऊन करण याने घरातील सर्वांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. वडील रविकांत पारकर यांना हाताच्या थापटाने मारून नंतर घरातील मासे कापण्याचा सुरा घेऊन त्याने डाव्या हातावर व पाठीवर वार करून मोठी जखम केली. या प्रकरणी रविकांत पारकर यांनी देवगड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी करण पारकर याचे विरुद्ध भादवी कलम 324,326,323,504 अन्वये गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 7जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List