गांजा प्रकरणातील आरोपींना 27 पर्यंत पोलीस कोठडी

गांजा प्रकरणातील आरोपींना 27 पर्यंत पोलीस कोठडी

पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी फाटा येथे पकडलेल्या दीडशे किलो गांजा प्रकरणातील चार आरोपींना सोमवारी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना येत्या 27 ता. पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

कल्याण निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर ओरिसा राज्यातून पुणे जिल्हयात गांजा विक्री साठी चालला असल्याची माहिती मुंबई येथील अमली विरोधी पथकाला मिळाली होती. त्या नुसार या पथकाने दगडवाडी फाटा येथे थांबलेल्या दोन गाड्यांची झडती घेतली असता त्या मध्ये सहा गोण्यांमध्ये दीडशे किलो गांजा आढळून आला होता. या वेळी गांजाची वाहतूक करणारे सागर मोरे,लियाकत शेख,रामेश्वर मोहिते,समीर शेख सर्व रा. पुणे जिल्हा यांना या पथकाने अटक करून काल रविवारी रात्री उशिरा पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आज या सर्व आरोपींना न्यायालया समोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना येत्या २७ ता पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;