हिंदुस्थान-झिम्बाब्वे टी-20मालिकेचे प्रसारण हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे, चार भाषेत करणार प्रसारण
आघाडीच्या क्रीडा प्रसारक, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने हिंदुस्थानच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विशेष टीव्ही आणि डिजिटल अधिकार विकत घेतले आहेत. युवा खेळाडू असलेला हिंदुस्थानी संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेतील सामने हरारे येथे खेळवण्यात येणार आहेत. ही मालिका 6 जुलै ते 14 जुलै 2024 दरम्यान होणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या मालिकेचे प्रसारण इंग्रजीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगु या चार भाषांमध्ये करणार आहे. पाच-सामन्यांची टी20आय मालिका सोनी स्पोर्ट्स टेन 3 (हिंदी) एसडी आणि एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन4 (तमिळ/तेलुगु) आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5एसडी आणि एचडीवर प्रसारित केली जाईल.
हिंदुस्थानचा झिम्बाब्वे दौरा सोनी स्पोर्ट्सवर जास्तीत जास्त प्रेक्षक पाहतील अशी अपेक्षा आहे. क्रिकेट चाहत्यांना अत्यंत प्रतिभावान हिंदुस्थानी संघाला लाईव्ह खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. हिंदुस्थानी संघाने झिम्बाब्वेचा शेवटचा दौरा 2022 मध्ये केला होता. त्यावेळी हिंदुस्थानी संघ ३वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मेनइनब्लू’ने मालिकेतील सर्व तीन सामन्यात विजय मिळवून परफेक्ट विजय मिळवला होता आणि शुभमन गिलची मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली गेली होती. विशेष बाब म्हणजे, हिंदुस्थान आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ 2016 मध्ये द्विपक्षीय टी-20 मालिका खेळण्यासाठी आमनेसामने आले होते, त्यावेळी हिंदुस्थानी संघाने 2-1ने विजय मिळवला होता. हिंदुस्थानचा झिम्बाब्वे दौरा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या समृद्ध क्रिकेट संपत्त्यांमध्ये एक महत्वपूर्णभर आहे, ज्यामध्ये न्यूझीलंड क्रिकेट, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेटसह अनेक क्रिकेट बोर्डांचा समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List