नगर अर्बन बँक घोटाळा, डॉ.निलेश शेळकेला अटक
नगर अर्बन बँकेच्या कर्ज प्रकरणाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथे प्रतिष्ठित डॉक्टर निलेश शेळके याला सोमवारी आर्थिक गुन्हे विभागाच्या पथकाने पकडले आहे. दरम्यान या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांनी आम्ही या प्रकरणाची चौकशी करून मंगळवारी शेळके यांना न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगितले.
नगर अर्बन बँकेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे या प्रकरणा संदर्भामध्ये बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी ,राजेंद्र चोपडा व अच्युत पिंगळे यांनी या बँकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. या प्रकरणासंदर्भामध्ये त्यांनी पाठपुरावा करत बँकेची फसवणूक ज्या ज्या लोकांनी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी सुद्धा केली होती. त्यानुसार नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. डॉ. निलेश शेळके यांच्यावर या अगोदर सुद्धा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केलेली होती व त्यांना अटक केली होती. या प्रकरणांमध्ये त्यांचा कर्जामध्ये सहभाग आहे त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करत तसेच इतर लोकांना हाताशी धरून संगणमत करून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळा केलेला आहे .या सर्व बाबी फॉरेन्सिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे डॉक्टर शेळके यांचा थेट समावेश असल्यामुळे पोलिसांनी त्यांना आज दुपारी अटक केली आहे.
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी अशोक कटारिया,अनिल कोठारी,राजेंद्र लुणिया ,प्रदिप पाटील सी ए शंकर अंदानी हे न्यायालयीन कोठडीत असून. नगर शहराचे डीवायएसपी अमोल भारती यांच्याकडे आला होतं त्यांनी या प्रकारात आता अविनाश प्रभाकर वैकर या आरोपीस अटक केली होती तोही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अर्बन बँकेच्या 291 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत बँकेतील अधिकारी आणि संचालक अटक झाले होते .
या बँकेच्या फस्कुनी प्रकरणांमध्ये या अगोदर सुद्धा बँकेच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली होती अनेकांची चौकशी सुद्धा या प्रकरणांमध्ये झालेली आहे तसेच शेवगाव या ठिकाणी बनावट सोने तारणाचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेला आह तेथे सुद्धा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची सुद्धा चौकशी सध्या सुरू आहे कोट्यावधी रुपयांचे बोगस सोने तारण सुद्धा या ठिकाणी झालेले आहे सध्या नगर अर्बन बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असून या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आले असून सध्या बँकेच्या थकबाकीदारांकडून वसुली कशा पद्धतीने होईल याकरता पाहिले जात आहे आर्थिक गुन्हे अनुच्छेद विभागाने या प्रकरणासंदर्भामध्ये नाशिक या ठिकाणी फॉरेन्सिक ऑडिट केले होते यामध्ये सीए मर्दा याचा सुद्धा समावेश होता तर डॉक्टर निलेश शेळके याच्या नावावर सुद्धा कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे तो थकबाकीदार असल्यामुळे तसेच त्याच्या खात्यामध्ये परस्परित्या पैसे कशा पद्धतीने आले हे सुद्धा महत्त्वाचे आहे त्यामुळे आता पोलिसांनी शेळके याला अटक केल्यानंतर अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे दरम्यान या संदर्भामध्ये उपाध्यक्ष अमोल भारती यांच्याशी संपर्क साधला असता सोमवारी दुपारी शेळकेला अटक करण्यात आली असून आम्ही या सर्व प्रकरणाचा तपास करत असून उद्या त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List