…तर तुमच्या दारात आंदोलन करेन; आमदार तनपुरे यांचा कृषी अधिकाऱ्यांना इशारा

…तर तुमच्या दारात आंदोलन करेन; आमदार तनपुरे यांचा कृषी अधिकाऱ्यांना इशारा

विमा कंपनी व कृषी खात्यातील अधिकारी संगनमताने पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे समजत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मी अधिवेशन सोडून तुमच्या दारात आंदोलन करेन, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे. तनपुरे सोमवारी कृषी कार्यालयात आले होते. या वेळी त्यांच्यासोबत शिवशंकर राजळे, रफिक शेख, राहुल गवळी,अमोल वाघ, इलियास शेख, पिनु मुळे, सुनिल अकोलकर, संभाजी लोंढे, अंबादास डमाळे,पंढरीनाथ चोथे,सुनील पुंड, राजेंद्र पाठक, सुनिल लवांडे, हेमंत पडूळे, अमोल घोरपडे उपस्थित होते.

या वेळी विनीत रामभाऊ डमाळे या शेतकऱ्याने मी व माझ्या भावाने पीकविमा भरला. माझ्या भावाला पीकविमा मिळाला तर मला मिळणार नाही, असे सांगण्यात आले. हे एकूण संतप्त झालेल्या तनपुरे यांनी एकाला तुम्ही पीकविमा देतात अन दुसऱ्याला देत नाही याचे कारण काय? असा सवाल केला. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याशिवाय मी येथून उठणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पाचशे रुपये कंपनीच्या एजंटला दिले त्यांना विम्याचा लाभ देण्यात आला. मात्र ज्यांनी दिले नाही त्यांना वंचित ठेवण्यात आले. डमाळे यांच्या शेतीचा पंचनामा कोणी केला ते मला दाखवा. तुम्हाला पैसेच हवे असेल तर पाचशेच्या किती नोटा घेऊन येऊ ते सांगा. तुम्ही येथे हळदी कुंकू वाटण्यासाठी बसले नसून शेतकऱ्यांची कामे करण्यासाठी बसले आहेत. तुम्ही फक्त भाजपच्या लोकांची कामे करतात का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

या प्रश्नावर आपण अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित करणार असून तातडीने दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी त्यांनी कार्यालयात उपस्थित असलेल्या सहायक कृषी अधिकारी सुनील देखणे यांच्याकडे केली. त्यानंतर तनपुरे यांनी जिल्हाकृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला. जिल्हा कृषीअधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसात या विषयाची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर तनपुरे शांत झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;