माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांची घरवापसी; मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांची घरवापसी; मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

भारतीय जनता पक्षातून तीन दिवसापूर्वी राजीनामा दिलेल्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील मंगळवारी ( 25 जून रोजी) सकाळी 11 वाजता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत.

गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षात कार्यरत असलेल्या हदगाव विधानसभा संयोजक माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी माजी मंत्री रावसाहेब दानवे नांदेडात असताना पक्ष सदस्यत्वाचा व हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या कुठल्या पक्षात जाणार याबद्दल विचारणा केली असता त्यांनी वेट अ‍ॅण्ड वॉच असे उत्तर दिले होते. त्यामुळे त्यांचा राजकीय निर्णय काय असेल याची राजकीय वर्तुळात चर्चा होत होती.

आता पाटील यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मुंबई येथे पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यापूर्वी देखील त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या, मात्र काही कारणाने मतभेद झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दहा वर्ष त्या या पक्षात होत्या. मात्र, विविध मुद्द्यांवर त्यांचे भाजपत मतभेद झाले. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात चांडाळ चौकडीचे राजकारण सुरु होते. त्यामुळे पक्षातील काही गोष्टी आपल्याला पटल्या नव्हत्या. भाजपच्या चांडाळ चौकडीतून माझी सुटका होत आहे. याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;