कंधार तालुक्यातील दरोड्याचा उलगडा; पोलिसांकडून 6 आरोपींना अटक, 34 लाख 88 हजाराचा मुद्देमाल जप्त

कंधार तालुक्यातील दरोड्याचा उलगडा; पोलिसांकडून 6 आरोपींना अटक, 34 लाख 88 हजाराचा मुद्देमाल जप्त

कौठा (ता.कंधार) येथे 15 जून रोजी पडलेल्या दरोड्याचा उलगडा झाला आहे. या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करुन पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 34 लाख 88 हजार 461 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

कौठा (ता.कंधार) येथील बि-बियाणाचे व्यापारी गजानन श्रीहरी येरावार यांच्या राहत्या घरी 15 जून रोजी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला होता. त्यात सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 41 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. यासंदर्भात नांदेड पोलिसांनी व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने वेगवेगळी पथके तैनात केली होती. तसेच सायबर सेलची मदत देखील मदत घेण्यात आली. त्या परिसरात व रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस दलातील निष्णांत अधिकारी व कर्मचारी तपास करीत होते.

दरोड्यातील काही आरोपी नांदेड व परभणीचे आहेत, अशी माहिती काही गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून चार आरोपी फरार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यातील दोन आरोपी गुजरातमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी सोनूसिंग बलविरसिंघ भोंड रा.उदनानगर सुरत (गुजरात), जयसिंग बावरी रा.दंतेश्वर, संतोष वाडी बडोदा (गुजरात), अरुण नागोराव गोरे उस्माननगर ता.कंधार, शेख खदीर शेख मकदूम साब रा.इकबालनगर धनेगाव जि.नांदेड, राजासिंघ हिरासिंघ टाक रा.अण्णाभाऊ साठे नगर जिंतूर रोड परभणी, गुरुमुखसिंघ हिरासिंघ टाक रा.नवामोंढा जिंतूर रोड परभणी यांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या दरोड्याबाबत चौकशी केली असता अन्य चार आरोपीसोबत आम्ही हा दरोडा टाकल्याचे त्यांनी सांगितले. यातील सतबिरसिंघ टाक रा.अकोला, जसपालसिंघ जुन्नी रा.परतूर जि.जालना, राजपालसिंघ दुधानी रा.सिंदखेड राजा जि.बुलढाणा, सरदार खान अमिरउल्ला खान रा.पुसद जि.यवतमाळ हे आरोपी अद्याप फरार असून, त्यांना लवकरच ताब्यात घेवू असेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

दरोडेखोरांकडून चोरीच्या मालापैकी 405 ग्रॅम सोन्याचे दागिने, 55 ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख 8 लाख 50 हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 34 लाख 88 हजार 461 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याकामी अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, अबिनाशकुमार, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, रवीकुमार वाव्हुळे आदींनी महत्वाची भूमिका बजावल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;