हरभजन सिंगने ट्रोलर्सची विकेट काढली; सडेतोड उत्तरांनी केली बोलती बंद
हिंदुस्थानी संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगशी पंगा घेणे महागात पडू शकतं याचा नुकताच प्रत्यय सोशल मीडिया साईट एक्सवर काही युजर्सना आला आहे. हरभजन सिंगने एक्सवर आपल्या काही ट्रोलर्सची चांगलीच विकेट घेतली आहे. त्याच्या सडेतोड उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
हरभजन सिंग आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मधील कॉमेंट्री पॅनेलचा एक भाग आहे आणि काही लोकांनी त्याच्या कॉमेंट्रीसाठी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि तो राज्यसभेचा सदस्य आहे, पण राज्यसभेत जात नाही यावरही प्रश्न उपस्थित केला. हरभजन सिंग अशा क्रिकेटपटूंपैकी एक आहे जो मैदानावरही कोणालाही उत्तर द्यायला घाबरत नव्हता आणि आता त्याने सोशल मीडियावरही तेच केले आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हे काही नवीन नाही.
एका युजरने एक फोटो शेअर केला त्यामध्ये एका युजरने एका व्यक्तीच्या कानातून रक्त वाहत आहे आणि असे फोटो पोस्ट करत लिहीले की, काही नाही भावा हरभजन सिंह ची शायरीवाली कॉमेण्ट्री ऐकली. हरभजन सिंह याने यावर उत्तर देत लिहीले की,यावर उत्तर देताना हरभजन सिंगने लिहिले की, ‘देवाचे आभार कुठेही रक्तस्त्राव झाला नाही, देव तुम्हाला आशीर्वाद देईल, तुमचा प्रतिसाद चांगला आहे.’ यानंतर अन्य एका युजरने लिहिले, ‘कॉमेण्ट्रीमध्येही मजा नाही आणि ट्विटरवरही मजा नाही…’ यावर हरभजन सिंगने उत्तर दिले, ‘हो प्लीज सोडा, तुम्ही मला तिकडेही ऐकता तसेच इथेही ऐकत आहात.. त्यामुळे सोडून द्या.
यानंतर एका अन्य यूजरने सर्व मर्यादा ओलांडत हरभजन सिंगसाठी काही आक्षेपार्ह शब्द वापरले आणि त्यांच्यावर लोकांच्या टॅक्सचे पैसे खात असल्याचा आरोप केला आणि राज्यसभेत कोणतेही काम केले नाही. यावर हरभजन सिंगने त्याचा चांगलाच समाचार घेत कान उघडणी केली, ‘भाऊ, माझा सगळा पगार त्या मुलांच्या शिक्षणासाठी जातो, ज्यांना शिक्षण घेता येत नाही. मी पगाराचा एक पैसाही स्वत:वर खर्च करत नाही. मी सुद्धा तुमच्यासारखाच करदाता आहे, इतका रागावू नकोस आणि जर तुलाही काही शिक्षण हवे असेल तर मला सांग आणि मी त्याची काळजी घेईन, कारण तुम्हाला खरोखर शिष्टाचार शिकण्याची गरज आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List