T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये इरफान पठाणच्या मेकअप आर्टिस्टचा स्विमींग पूलमध्ये संशयास्पद मृत्यू
सध्या वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कपचे सामने सुरू आहे. दरम्यान आज हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदुस्थानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणचा मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान फैयाजचा मृतदेह हिंदुस्थानात पाठवण्यासाठीचा सगळा खर्च इरफान पठाण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे .
फैयाज अन्सारीचा मृत्यू शुक्रवारी सायंकाळी एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना झाला असल्याचे त्याचा चुलत भाऊ मोहम्मद अहमद यांनी सांगितले. टी-20 विश्वचषक 2024 या स्पर्धेतील सुपर 8 च्या लढती वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या जात आहेत. इरफान पठाण सामन्याच्या कॉमेंट्रीसाठी वेस्ट इंडिजमध्ये गेला आहे. फैयाजही पठाणसोबत वेस्ट इंडिजमध्ये उपस्थित होता. शुक्रवारी एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना फैयाजचा मृत्यू झाला.
फैयाज अन्सारी याचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. त्याच्या आकस्मित निधनामुळे कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान इरफान पठाण स्वत: वेस्ट इंडिजमध्ये सर्व औपचारिकता पूर्ण करून मृतदेह हिंदुस्थानात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. फैयाजचा मृतदेह आल्यानंतर कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. या प्रक्रियेला तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता असल्याचे मोहम्मद अहमद यांनी सांगितले.
कोण आहे फैयाज अन्सारी?
फैयाज अन्सारी हा मूळचा बिजनौरच्या नगीना तहसीलमधील मोहल्ला काझी सराय येथील रहिवासी होता. गेली अनेक वर्षे तो मुंबईत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता. मुंबईत त्याचे सलोन देखील होते. एक दिवस इरफान पठान त्यांच्या सलोनमध्ये गेले होते. त्यानंतर दोघांची ओळख झाली आणि इरफानने फैयाजला आपला मेकअप आर्टिस्ट बनवले. इरफाननेही त्याला परदेशात सोबत नेण्यास सुरुवात केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List