देशाच्या संविधानाला कोणतीही शक्ती स्पर्श करू शकत नाही! राहुल गांधींनी मोदी-शहांना ठणकावलं

देशाच्या संविधानाला कोणतीही शक्ती स्पर्श करू शकत नाही! राहुल गांधींनी मोदी-शहांना ठणकावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संविधानावर ‘हल्ला’ करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. संविधानावरील हे हल्ले विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडीला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं.

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाल्याच्या दिवशी पत्रकारांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं की कोणतीही शक्ती संविधानाला हात लावू शकत नाही. यानंतर त्यांनी आपल्या हातातील संविधानाची पुस्तिकाही पत्रकारांना दाखवली.

‘पंतप्रधान आणि अमित शहा संविधानावर जो हल्ला करत आहेत, तो आम्हाला मान्य नाही. आम्ही असं होऊ देणार नाही. त्यामुळे शपथ घेताना आम्ही संविधानाला धरून शपथ घेतली आहे. आमचा संदेश थेट आहे, देशाच्या संविधानाला कोणतीही शक्ती स्पर्श करू शकत नाही’, असं राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;