संसदेबाहेरील महापुरुषांचे पुतळे हटविले! सातारच्या दोन्ही राजांनी भाजपला जाब विचारावा, लक्ष्मण माने आक्रमक

संसदेबाहेरील महापुरुषांचे पुतळे हटविले! सातारच्या दोन्ही राजांनी भाजपला जाब विचारावा, लक्ष्मण माने आक्रमक

संसदेच्या दर्शनी भागातील महापुरुषांचे पुतळे हटविल्याबाबत सातारच्या दोन्ही राजांनी केंद्रातील भाजप सरकारला रस्त्यावर उतरून जाब विचारला पाहिजे. तसेच हे पुतळे मूळ स्थितीत यावेत, यासाठी देशव्यापी आंदोलन उभे करून त्याचे नेतृत्व या दोघांनी केले पाहिजे. हे शक्य नसेल तर त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन बाहेर पडावे, अशी कडक भूमिका उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी मांडली आहे.

सातारा येथील श्रावस्ती सांस्कृतिक संकुलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत लक्ष्मण माने बोलत होते. याकेळी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सरचिटणीस नारायण जावलीकर उपस्थित होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे लोकसभेच्या दर्शनी भागात असलेले पुतळे भाजप सरकारने कुठल्यातरी हॉलमध्ये अडगळीत टाकले आहेत. हे महापुरुष केवळ महाराष्ट्राचे नक्हे, तर ते संपूर्ण देशाची अस्मिता आहेत. जात, धर्म, पंथ, लिंग या सर्व भेदनीतीच्या पलीकडे त्यांनी राष्ट्र उभे केले. या देशातील गुलामगिरीला चुड लाकली. समताधिष्ठत समाजरचनेचे स्नप्न पाहिले. त्यांचे पुतळे हे केवळ पुतळे नाहीत ते आम्हा तमाम देशवासीयांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे पुतळे उचलून भाजपने त्यांचा अवमान केला आहे, अशा तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत माने यांनी याचा निषेध केला आहे.

सातारा ही शिवछत्रपतींची राजधानी आहे आणि राजघराण्यातील दोन्ही राजे भाजपमध्ये आहेत. हे पुतळे मूळ जागेवर प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून भाजपला जाब विचारला पाहिजे व पुतळे मूळ स्थितीत यावेत, यासाठी देशव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे. हे शक्य नसेल तर भाजपचा राजीनामा देऊन बाहेर पडले पाहिजे; अन्यथा राजघराण्याचा वारसा सांगण्याचा अधिकार या दोघांना राहणार नाही, असे लक्ष्मण माने म्हणाले.

अन्यथा 22 जुलैला लाक्षणिक उपोषण

दि. 22 जुलैला संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. तोपर्यंत छत्रपतींचे वारसदार म्हणून दोघांनी याप्रकरणी ठोस भूमिका न घेतल्यास त्यादिवशी सातारा जिल्हाधिकारी कचेरीपुढे आपण लाक्षणिक उपोषण करणार आहे, असे लक्ष्मण माने यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;