सलमान खान मुलींकडे अट्रॅक्ट होतो, पण…, वडील सलीम खान यांच्याकडून भाईजानचं मोठं रहस्य उघड

सलमान खान मुलींकडे अट्रॅक्ट होतो, पण…, वडील सलीम खान यांच्याकडून भाईजानचं मोठं रहस्य उघड

बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सलमान खान याच्यावर अनेक तरुणी फिदा आहेत. अनेक अभिनेत्रींना सलमान खान याने डेट देखील केलं, पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे कायम असतो चर्चेत. असं असताना देखील वयाच्या 58 व्या वर्षी सलमान एकटाच आहे. अभिनेता का सिंगर आहे? याचं कारण खुद्द सलीम खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

सलमान खान याचे चाहते कायम अभिनेत्याला कधी लग्न करणार? असा प्रश्न विचारत असतात. कोणत्याही शोमध्ये किंवा सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान आजही सलमानला लग्नाबद्दल विचारलं जातं. पण अभिनेता कायम उत्तर देणं टाळतो. आता सलीम खान यांनी लेकाचं सर्वात मोठं रहस्य उघड केलं आहे.

सलमान खान लग्नाबद्दल काय म्हणाला होता?

एका मुलाखतीत सलमान खान याने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. सलमान खान म्हणाला होता, ‘लग्न करण्यासाठी लाखो, कोट्यवधी रुपये खर्च होतात आणि एवढा खर्च मला परवडणारा नाही… त्यामुळे मी अद्यापही सिंगल आहे…’ असं सलमान म्हणाला होता.

आता सलीम खान यांनी मुलगा सलमान खान याच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सलमान रिलेशनशिपमध्ये सहज जातो. पण नातं लग्नापर्यंत घेऊन जाण्यास त्याला भीती वाटते. तो खूप सिंपल आहे. तो मुलींकडे अट्रॅक्ट होतो. पण कायम विचार करतो त्याच्या आयुष्यात येणारी मुलगी त्याच्या आई प्रमाणे कुटुंबाची काळजी घेऊ शकणार नाही.’

सलमान खान याची इच्छा सांगत सलीम खान म्हणाले, ‘तो ज्या कोणत्या मुलीसोबत लग्न करेल तिने पती आणि मुलांची योग्य काळजी घेतली पाहिजे… अशी सलमानची इच्छा आहे. तिने मुलांसाठी जेवण केलं पाहिजे, त्यांना तयार केलं पाहिजे, त्यांचा होमवर्क घेतलं पाहिजे… आजच्या काळात असं होणं कठीण आहे…’ असं देखील सलीम खान, सलमान खान याच्याबद्दल म्हणाले.

सलमान खान याच्या एक्स-गर्लफ्रेंड

सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. ज्यामध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री संगीत बिजलानी हिचं आहे. संगीता बिजलानी हिच्यासोबत सलमान खान याच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या. पण दोघांचं लग्न मोडलं आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले.

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत देखील सलमान खान याच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर देखील घेतलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्यण घेतला. पण आजही त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;