जगभरातून महत्वाच्या बातम्या

जगभरातून महत्वाच्या बातम्या

अंतराळातील कचरा घरावर कोसळला

अंतराळातून खाली फेकलेला कचरा घरावर कोसळला आणि घराचे नुकसान झाले. याप्रकरणी फ्लोरिडा येथील एका पुटुंबाने अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’वर 80 हजार डॉलर म्हणजे सुमारे 67 लाख रुपयांचा दावा ठोकला आहे. 8 मार्च 2021 साली अलेजांद्रो ओटेरो यांच्या घरावर अंतराळातून 700 ग्रॅम वजनाचा तुकडा कोसळला. या दुर्घटनेत ओटेरो यांच्या घराचे छत तुटले. हा तुकडा म्हणजे वापरलेल्या बॅटरीचा कार्गो पॅलेटचा तुकडा आहे. इंटरनॅशनल स्पेस सेंटर येथून कचरा म्हणून तो फेकण्यात आला होता.

जीवघेण्या उष्णतेचा प्रकोप

मेक्सिको, अमेरिका येथील उष्णतेचा धोका 35 पटीने वाढल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय. अभ्यासासाठी वर्ल्ड वेदर ऑट्रिब्युशन (डब्ल्यूडब्ल्यूए) नेटवर्कने मेक्सिको, दक्षिण-पश्चिम अमेरिका, ग्वाटेमाला, बेलीज, अल साल्वाहडोर आणि होंडुरास देशांची निवड केली. डब्ल्यूडब्ल्यूएने उत्तर गोलार्धातील सर्वाधिक उष्ण पाच दिवस आणि पाच रात्रींचा अभ्यास केला.

योगासनामुळे एफआयआर

अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात योग करून आणि ती छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करणे अर्चना मकवाना या सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सरला महागात पडले. तिच्याविरोधात पंजाबमध्ये एफआयआर दाखल झाला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने अर्चनाविरोधात तक्रार केली. तसेच कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल तीन सुरक्षारक्षकांना निलंबित केले.

हिंदुजांविरोधातील तक्रार मागे

हिंदुस्थानी वंशाचे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत उद्योजक हिंदुजा कुटुंबियांची स्वीर्त्झलँडच्या वरिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यांच्या नोकरांनी हिंदुजा यांच्यावर केलेले छळाचे आरोप त्यांनी मागे घेतले. 21 जून रोजी कनिष्ठ न्यायालयाने हिंदुजा कुटुंबातील 4 जणांना नोकरांचा छळ केल्याप्रकरणी साडेचार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

अधिकाऱयाचा झाला शिपाई

हॉटेलमध्ये महिला पोलीस कर्मचाऱयासोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळलेल्या पोलीस उप-अधीक्षकाचे थेट शिपाई पदावर डिमोशन करण्यात आले. कृपा शंकर कनौजिया असे या पोलीस अधिकाऱयाचे नाव असून याबाबत सविस्तर अहवाल उन्नाव पोलिसांनी उत्तर प्रदेश सरकारकडे सादर केला. त्यानंतर तीन वर्षांनी कनौजियाचे डिमोशन करण्यात आले.

15 कुत्र्यांचा महिलेवर हल्ला

चित्रापुरी हिल्स, मनीकाsंडा, हैदराबाद येथे मार्ंनग वॉकसाठी निघालेल्या एका महिलेला 15 हून अधिक भटक्या कुत्र्यांनी घेरले. यावेळी महिलेने सुमारे 40 सेपंद कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव केला. कॉलनीतील सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. या घटनेनंतर महिलेच्या पतीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला.

अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा

यंदाची अमरनाथ यात्रा सुरू व्हायला आठवडाभराचा कालावधी शिल्लक असून यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि कश्मीरच नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे. यात्रा यशस्वीरित्या पार पडावी यासाठी विविध सोयी-सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अमरनाथ यात्रा सुरू व्हायला आठवडाभराचा कालावधी शिल्लक असून यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि कश्मीरच नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे. यात्रा यशस्वीरित्या पार पडावी यासाठी विविध सोयी-सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;