सांगलीत नालेसफाईचे 99 टक्के काम पूर्ण
मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी सांगली महापालिका स्तरावर केलेल्या नियोजनानुसार आजअखेर महापालिका क्षेत्रातील नाल्यांची 99 टक्के सफाई पूर्ण झाली आहे. नालेस्वच्छतेबाबत नागरिकांना काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी दूरध्वनीद्वारे मुख्य स्वच्छता अधिकाऱयांकडे कराव्यात, असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी केले आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिक क्षेत्रातील 40 ते 50 किलोमीटरचे असलेले नाले स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. नालेसफाई शंभर टक्के शास्त्र्ााrय पद्धतीने व्हावी, यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी अनेकवेळा आरोग्य विभाग आणि संबंधित विभागाच्या बैठका घेऊन नियोजन केले.
उपायुक्त वैभव साबळे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्या नियंत्रणाखाली 20 वॉर्डांमध्ये साधारणपणे 82 नाले स्वच्छ करण्यात आले आहेत. तीन नाले हे बांधीव स्वरूपात असल्याने अशा एकूण 85 नाल्यांची 99 टक्के स्वच्छता करण्यात आली. संभाव्य पूरपरिस्थिती विचारात घेता नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List