सांगली महापालिकेतील सर्व अभियंत्यांची उद्या होणार लेखी परिक्षा

सांगली महापालिकेतील सर्व अभियंत्यांची उद्या होणार लेखी परिक्षा

सांगली महापालिकेतील बांधकाम विभागातील कार्यपद्धतीबद्दल अभियंत्यांकडून कार्यवाही होत नसल्याने आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी सर्वच अभियंत्यांची लेखी परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी (दि. 25) होणाऱया लेखी परीक्षेसाठी आता अभियंत्यांनी अभ्यास सुरू केला आहे. मंगलधाम येथे सकाळी दहा वाजता ही परीक्षा होणार आहे. परीक्षेस सर्व अभियंत्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

या परीक्षेत 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे बंधनकारक असून, त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास संबंधित अभियंत्यांच्या दोन वेतनवाढी रोखण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. याबाबतचे आदेश आयुक्त गुप्ता यांनी सर्व कार्यालयातील अभियंत्यांना दिले आहेत.

महापालिकेतील बांधकाम, नगररचना यांसह प्रभाग समित्या कार्यालयातील सर्व विभागांतील कायम, मानधनावरील अभियंते यांच्याकडे विविध भागांतील कामाची जबाबदारी आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कामाविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्याकडून समाधानकारक कामही होताना दिसत नाही.

महापालिकेचे आयुक्त गुप्ता यांनी स्थायी आदेशाद्वारे बांधकाम विभागाची कार्यपद्धती निश्चित करून करावयाच्या कामकाजाबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार अभ्यास करून बांधकाम विभागातील अभियंत्यांनी कार्यवाही करणे आवश्यक होते. 6 जून रोजी बांधकाम विभागाकडील चालू, अपूर्ण, पूर्ण कामांबद्दल घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत शाखा अभियंता व इतर अधिकाऱयांनी स्थायी आदेश वाचन केले नसल्याचे तसेच नियमातील तरतुदींची माहिती नसल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब प्रशासकीय दृष्टीने अतिशय गंभीर असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. शहर अभियंता कार्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालयाकडील सर्व कायम, मानधनावरील कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, नगर अभियंता, उपअभियंता यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेत 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे आवश्यक असून, त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास संबंधित अभियंत्यांच्या दोन वेतनवाढी रोखण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;