अनाथ मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार; अनाथाश्रम संचालिकेच्या मुलाला हायकोर्टाचा दणका, 10 वर्षांच्या सक्तमजुरीवर शिक्कामोर्तब

अनाथ मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार; अनाथाश्रम संचालिकेच्या मुलाला हायकोर्टाचा दणका, 10 वर्षांच्या सक्तमजुरीवर शिक्कामोर्तब

अनाथ मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अनाथाश्रमात तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱया संस्था संचालिकेच्या मुलाला उच्च न्यायालयाने दणका दिला. पीडित मुलीने खोटी तक्रार केल्याचा दावा करीत आरोपीने नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान दिले होते. तथापि, न्यायमूर्ती किशोर संत यांनी त्याचे अपील फेटाळले आणि दहा वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी अतुल अलबाद व त्याची आई सुशीला अलबाद या दोघांना नाशिक सत्र न्यायालयाने पोक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला होता. त्या शिक्षेविरोधात दोघांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. मुलीने उशिराने तक्रार केल्याच्या मुद्दय़ावरून अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा आरोपींनी केला होता. त्यावर पीडित मुलीतर्फे अॅड. यशोदीप देशमुख व अॅड. वैदेही देशमुख यांनी जोरदार आक्षेप घेतला. अनाथ मुलगी त्या अनाथाश्रमात राहत होती. तिला दुसरा आसरा नव्हता. त्यामुळे तिने आरोपीचे बळजबरीचे कृत्य मुकाटय़ाने सहन करणे स्वाभाविक होते, असा युक्तिवाद अॅड. यशोदीप देशमुख यांनी केला. त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल घेत न्यायालयाने अतुल अलबादची दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली, मात्र गुह्याला प्रवृत्त केल्याचा सबळ पुरावा नसल्याने संस्थाचालिका सुशीला अलबादची निर्दोष सुटका केली.

नेमके प्रकरण काय?

नाशिक जिह्यातील पेठ येथे जिल्हा आदिवासी महिला हक्क संरक्षण समितीच्या नियंत्रणाखाली अनाथ मुलींसाठी अनाथाश्रम चालवले जाते. 2013 मध्ये पीडित अनाथ मुलीला रेल्वे स्थानकाच्या आवारातून येथे आणले होते. त्यावेळी ती 14 वर्षांची होती.

2017 मध्ये मुलगी 18 वर्षांची झाल्याने तिची दुसऱया संस्थेत व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू झाले. यादरम्यान संस्थाचालिका सुशीला अलबाद हिने तिला नाशिकच्या अनुरक्षण गृहात नेले. तिथे वैद्यकीय चाचणी केली असता मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते.

ऑक्टोबर 2015 मध्ये दिवाळी सुट्टीत संस्थाचालिकेचा मुलगा अतुलने बळजबरी अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. हा प्रकार संस्थाचालिका सुशीलाला सांगितला होता, मात्र तिने कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. नंतर अतुलने वारंवार अत्याचार केले होते. मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर अनुरक्षण गृहाच्या अधीक्षकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;