एलॉन मस्क 12 मुलांचा बाप
स्पेस एक्स आणि टेस्ला या जगविख्यात कंपन्यांचे मालक एलॉन मस्क 12व्या मुलाचे पिता बनले आहे. ब्लूमबर्ग मीडिया हाऊसने ही गोड बातमी दिली आहे. मस्क यांची पार्टनर आणि न्यूरालिंकची व्यवस्थापक शिवॉन जिलिसल हिच्यापासून मस्क यांना 12 वे मूल झाले. वर्षाच्या सुरुवातीलाच या मुलाचा जन्म झाला होता; परंतु मस्क यांनी काही कारणानी ही बातमी गुप्त ठेवली होती.
2022 मध्ये मस्क आणि शिवॉन यांना दोन जुळी मुले झाली. याव्यतिरिक्त मस्क यांना 8 मुले असून त्यापैकी 5 मुले त्यांची पहिली पत्नी राइटर जस्टिन मस्क आणि तीन मुले संगीतकार ग्रिम्स हिच्यापासून जन्मली आहेत. मस्क यांनी आपल्या कंपनीतील महिला कर्मचाऱयांवर मुले जन्माला घालण्यासाठी दबाव टाकला होता असा दावा अमेरिकेतील वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने केला होता. त्यानंतर तीन महिलांनी मस्क आणि त्यांच्यात लैंगिक संबंध असल्याचा दावा केला होता. एका महिलेने तर मस्क यांनी अनेकदा आपल्यावर मुले जन्माला घालण्याचा दबाव टाकल्याचा आरोप केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List