स्टॉक ट्रेडिंगचे आमिष पडले 28 लाखांना; सायबर चोरट्यांकडून लूट सुरूच, पोलिसांनी हात टेकले

स्टॉक ट्रेडिंगचे आमिष पडले 28 लाखांना; सायबर चोरट्यांकडून लूट सुरूच, पोलिसांनी हात टेकले

सायबर चोरटय़ांनी नागरिकांना वेठीस धरले असून, विविध प्रकारची आमिषे दाखवून दरदिवशी लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. मात्र, तरीही नागरिकांचा हव्यास कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, वारंवार फसवणुकीच्या घटना घडूनही अद्यापपर्यंत पुणे सायबर पिंवा संबंधित पोलीस ठाण्याने एकाही मोठय़ा सायबर गुह्याची उकल केली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सायबर चोरटय़ांना पुणे पोलिसांची मूकसंमती आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

स्टॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगून सायबर चोरटय़ांनी तरुणाला 28 लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना 19 एप्रिल ते 23 मे कालावधीत आंबेगाव बुद्रूकमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक सायबर चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुण कुटुंबीयासह आंबेगाव बुद्रूकमध्ये राहायला आहे. 19 एप्रिलला सायबर चोरटय़ाने त्यांना मेसेज करून संपर्क केला. त्यानंतर स्टॉक ट्रेडिंगबाबतची माहिती दिली. त्यानंतर एका व्हॉट्सअॅप गुपमध्ये अॅड करून त्याठिकाणी त्यांना स्टॉक ट्रेडिंगचा फायदा कसा होतो, याचे प्रात्यक्षिक दाखविले.

सायबर गुह्यांची उकलच नाही; पोलिसांची उदासीनता

शहरात दिवसेंदिवस सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. फक्त पुण्यात दरदिवशी किमान एक कोटी रुपयांचा गंडा नागरिकांना घातला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून फसवणुकीचा आलेख वाढला आहे. मात्र, तरीही अद्यापपर्यंत पुणे सायबर पोलीस आणि गुह्याची नोंद असलेल्या ठाण्याकडून तपासाला गती दिली जात नाही. त्यामुळे सायबर चोरटय़ांचे फावले असून, ऑनलाइन लुटीसाठी रान मोकळे आहे. सायबर चोरटय़ांमुळे नागरिक अक्षरशŠ वैतागले असून, याकडे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कटाक्षाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;