शत्रुघ्न सिन्हा आहेत आनंदी? सोनाक्षी – झहीर यांच्या कोर्ट मॅरिजवर पहिली प्रतिक्रिया
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने रविवारी मुंबई येथील वांद्र याठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. झहीर आणि सोनाक्षीने त्यांच्या कोर्ट मॅरेजनंतर दादरमधील बॅस्टियन येथे भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं होते. झहीरसोबतच्या आंतरधर्मीय विवाहामुळे सोनाक्षीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. अखेर सोनाक्षी – झहीर यांनी लग्नाचे फोटो पोस्ट करत भानवा व्यक्त केल्या आहे. आता फक्त सेलिब्रिटीच नाहीतर, चाहते देखील दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असताना. अभिनेत्रीचे वडील आणि दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लेकीच्या लग्नानंतर काय भावना आहे? असा प्रश्न शत्रुघ्न यांना विचारण्यात आला.
विचारलेल्या प्रश्नावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘ही काय विचारण्याची गोष्ट आहे का? प्रत्येक बापाला या क्षणांची प्रतीक्षा असते. जेव्हा लेकीने निवडलेल्या मुलाला तिला सोपवायचं असतं. दोघांचं नातं सुरक्षित राहू दे. ‘ सांगायचं झालं तर, 44 वर्षांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिभाशाली मुलगी पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्न केलं. आता सोनाक्षी हिने देखील तिच्या आवडीने लग्न केलं आहे. असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
सोनाक्षी – झहीर यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र दोघांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. लग्नाचे फोटो फोटो करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे. आजचा दिवस खास आहे… सात वर्षांपूर्वी याच दिवशी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. प्रेम एक सुंदर भावना आहे आणि तेव्हाच ठरवलं की आता आयुष्यभर सोबत राहायचं…’
‘या प्रेमाने अनेक संकटांचा सामना केला आहे. आज आम्ही दोघे या क्षणात आहोत… आमच्या दोन्ही कुटुंबियांच्या शुभेच्छा आणि दोन्ही देवांचे आशीर्वाद असल्यामुळे प्रवास लग्नापर्यंत पोहोचला आहे. आम्ही पती – पत्नी झालो आहोत… सोनाक्षी – झहीर – 23.06.2024’ अशा भावना अभिनेत्री कॅप्शनच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
सांगायचं झालं तर, सोनाक्षी – झहीर गेल्या 7 वर्षांपासून एकत्र आहेत. अखेर दोघांनी त्यांच्या अखेर बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंडच्या नात्याला पती – पत्नीचं नाव दिलं…. 23 जून 2024 मध्ये सोनाक्षी – झहीर यांनी लग्न केलं. झहीर – सोनाक्षी 23 जून 2017 पासून एकत्र आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List