पोलीस ठोस पुरावे सादर करू न शकल्याने आरोपी सुटला, हायकोर्टाने पोक्सोची दहा वर्षांची शिक्षा केली रद्द

पोलीस ठोस पुरावे सादर करू न शकल्याने आरोपी सुटला, हायकोर्टाने पोक्सोची दहा वर्षांची शिक्षा केली रद्द

पीडिता अल्पवयीन असल्याचे ठोस पुरावे पोलीस सादर न करू शकल्याने उच्च न्यायालयाने आरोपीची शिक्षा रद्द केली. या आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती.

न्या. सारंग कोतवाल यांच्या एकल पीठाने अपील याचिका मंजूर करत आरोपीच्या सुटकेचे आदेश दिले. आरोपी व पीडितेमध्ये संमतीने शारीरिक संबंध झाले होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पीडितेच्या जन्मतारखेचा पुरावा पोलीस सादर करू शकले नाहीत. आरोपीला संशयाचा फायदा दिला जात आहे, असे न्या. कोतवाल यांनी नमूद केले.

न्यायालयाचे निरीक्षण

पीडिता शाहसोबत लोकल ट्रेनने अंबरनाथला गेली. तेथून उल्हासनगरला गेली. सायंकाळी त्यांनी हा प्रवास केला. त्यावेळी तिने एकदाही शाहला विरोध केला नाही. ते दोन महिने सोबत राहिले. शाहने बलात्कार केला असा पीडितेचा दावा आहे. तिने प्रतिकार केल्याचा जबाब कुठेही नमूद नाही. एकदा कधी तरी शारीरिक संबंधांना नकार दिल्याचे तिचे म्हणणे आहे. जबरदस्ती झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

काय आहे प्रकरण

एजहार अली हसन शाह असे सुटका झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडिता व शाहची मैत्री होती. शाहला पीडितासोबत विवाह करायचा होता. त्यास पीडिताने नकार दिला होता. 30 जानेवारी 2017 रोजी शाह पीडितेला अंबरनाथ येथे घेऊन गेला. तेथून तो पीडितेला उतर प्रदेश येथे घेऊन जात होता. ट्रेनमध्ये टीसीने त्याची चौकशी केली. त्यावेळी पीडितेने घरच्यांशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी शाहला अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;