नव्या पिढीवर विंदांच्या काव्याची मोहिनी; धवल चांदवडकरचे नवे गाणे ‘शुक्र ऐकतो अतां…’

नव्या पिढीवर विंदांच्या काव्याची मोहिनी; धवल चांदवडकरचे नवे गाणे ‘शुक्र ऐकतो अतां…’

कविवर्य विंदा करंदीकर रचित ‘शुक्र ऐकतो अतां…’ हे नवे गाणे नुकतेच रसिकांना भेटीला आलेय. जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून 21 जून रोजी गाणे रिलीज करण्यात आले. हे गाणे धवल चांदवडकर आणि सई टेंभेकर यांनी गायलंय, तर  संगीतकार चिन्मय लेले आहेत. अवीट गोडीचे गाणे अल्पावधीत लोकांच्या पसंतीस उतरलंय.

याआधी  विंदांचे ‘लागेल जन्मावे पुन्हा…’ हे गाणे धवल चांदवडकरने गायले होते. या गाण्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.  त्यानंतर आता ‘शुक्र ऐकतो अतां…’ हे गाणे आलेय. विंदांच्या गाण्याची सीरिज करणार असून लवकरच तिसरे गाणे करू, असे धवलने सांगितले. ‘शुक्र ऐकतो अतां…’ रोमँटिक गीत आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या भावना, त्यांचा नकळत संवाद – आश्वासनं या गाण्यातून मनाला भिडतात, असे धवलने सांगितले. विंदांचे काव्य ‘टाईमलेस’ आहे. सध्याचा ट्रेंड वेगळा असला तरी नव्या पिढीला  ही गाणी आवडत आहेत. नव्या पिढीला चांगलं सातत्याने दिलं की, त्यांच्या कानाला सवय लागेल, असे धवल म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;