सरकारी कामात अडथळा; दोघांविरुद्ध गुन्हा

सरकारी कामात अडथळा; दोघांविरुद्ध गुन्हा

नशा करणाऱया तरुणावर कारवाई केल्याने दोघांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याची घटना कांदिवली येथे घडली. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी भव्य शहा आणि कौशील शहाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे कांदिवली पोलीस ठाण्यात कर्तव्यास होते. गेल्या आठवडय़ात ते बिट मार्शल म्हणून कर्तव्यास होते. रात्री ते कांदिवलीच्या महावीरनगर येथे गस्त करत होते. तेव्हा तेथे एक जण गांजा पिताना दिसून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात नेले जात होते. तेव्हा तेथे प्रचंड गर्दी झाली. पोलिसांनी जमावाला गर्दी करू नये असे सांगितले. त्याच दरम्यान गर्दीतून एकाने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. नशा करणाऱया त्या तरुणाला सोडून द्यावे असे सांगून तो पोलिसांना शिवीगाळ करत होता. शिवीगाळ करणाऱयाला शांत राहण्यास सांगितले. मात्र तो ऐकत नव्हता. त्याच दरम्यान दोघांनी तक्रारदार यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या दोघांविरोधात गुन्हा नोंद केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;