ऑलिम्पिक यजमानपदाच्या तयारीला गती कधी मिळणार? ऑलिम्पियन नेमबाज अंजली भागवतचा सवाल

ऑलिम्पिक यजमानपदाच्या तयारीला गती कधी मिळणार? ऑलिम्पियन नेमबाज अंजली भागवतचा सवाल

ऑलिम्पिक यजमानपदासाठी हिंदुस्थानने उत्सुकता दाखवली हे खूप चांगले आहे, मात्र दुसऱया देशात ऑलिम्पिकच्या तयारीला सुरुवातदेखील झाली आहे. आपण मात्र अजून आराखडा बनवण्यातच अडकून पडलो आहोत. त्यामुळे या तयारीला गती मिळणार कधी, असा सवाल हिंदुस्थानची ऑलिम्पियन नेमबाज अंजली भागवत यांनी केला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या सहकार्याने पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात ऑलिम्पिक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात अंजली भागवत बोलत होत्या. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उपस्थित ऑलिम्पियन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.  यावेळी देशासाठी क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे धनराज पिल्ले, अंजली भागवत, देविंदर वाल्मीकी, विक्रम पिल्ले यांच्यासह अनेक ऑलिम्पियन तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडापटू या ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित समारोहाला उपस्थित होते.

सकाळी लालमहाल येथून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून क्रीडा रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीतही अनेक खेळाडू, क्रीडा संघटक उपस्थित होते. स. प. महाविद्यालयात रॅलीची सांगता झाल्यावर झालेल्या सोहळय़ात क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उपस्थित ऑलिम्पियन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर जिम्नॅस्टिक, वूशू, मार्शल आर्ट, मुष्टियुद्ध, तायक्वाँदो, योगासन, मल्लखांब अशा अनेक खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. हिंदुस्थानी हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनी आपल्या भाषणात खेळाडूंवर अन्याय होणार नाही याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.

रखडलेले शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार लवकरच!

यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले, शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा काही कारणांनी रखडला आहे. मात्र लवकरच या सोहळय़ाचा दिवस निश्चित करून भव्य स्वरूपात हा कार्यक्रम घेण्याचेही आश्वासन बनसोडे यांनी दिले. ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा देताना क्रीडामंत्र्यांनी इनडोअर क्रीडा सुविधांसाठी सात लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;