सिद्धिविनायकाचे दर्शन उद्या विनासायास; मंदिर न्यासाची सुसज्ज व्यवस्था
वर्षातल्या दुसऱया अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त (मंगळवार 25 जून) मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची इतर दिवसांपेक्षा दुप्पट गर्दी होणार आहे. होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर न्यासाकडून चोख व्यवस्था उभारण्यात आली आहे. दर्शन, आरतीच्या वेळेसह भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
श्री सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक धार्मिक स्थळ आहे. मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाकरिता येतात. त्यात अंगारकी असल्यामुळे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. यात अॅपद्वारे भाविकांना थेट दर्शन, मंडपात मोठा एलईडी टीव्ही, रांग व्यवस्था, मंडप व्यवस्था, पादत्राणे व्यवस्था, अग्निशामक सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, मोफत पाणी आणि चहा व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह, विनाशुल्क बस सुविधा, सुरक्षा यंत्रणा, पार्ंकग व्यवस्थाही करण्यात आली आहे.
‘श्रीं’चे दर्शन
श्री दर्शन – मध्यरात्री 1.30 ते पहाटे 3.15 वाजता, पहाटे-3.50 ते दुपारी 12 वाजता, दुपारी – 12.30 ते संध्याकाळी 7 वाजता, संध्याकाळी 7.10 ते रात्री 9 वाजता, रात्री – 10.45 ते रात्री 11.50 वाजता.
महापूजा, आरती, नैवेद्य
काकड आरती, महापूजा – रात्री 12.10 ते 1.30 वाजता, आरती – पहाटे 3.15 ते 3.50 वाजता, नैवेद्य – दुपारी 12 ते 12.30 वाजता, धूप आरती – संध्याकाळी 7 ते 7.10 वाजता, महापूजा, नैवेद्य, आरती – रात्री 9 ते 10.45 वाजेपर्यंत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List