मुंबईत लोकसभेच्या मतदानात अनागोंदी; उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी आयोगाने मागवला अहवाल
लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मुंबईमध्ये अनागोंदी झाली होती. जाणूनबुजून मतदान प्रक्रियेत विलंब लावला गेल्याने अनेक मतदार रणरणत्या उन्हात रांगेत उभे राहून पंटाळले होते आणि मतदान न करता माघारी गेले होते. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आरोप आणि टीका केली होती. त्याची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे.
मुंबई आणि ठाण्यात संथगतीने मतदान प्रक्रिया राबवली गेल्यामुळे केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उन्हाळय़ाचे दिवस असूनही आयोगाने मतदारांसाठी मंडप, पिण्याचे पाणी, आसने अशी कोणतीही व्यवस्था न केल्याने वयोवृद्ध आणि महिला मतदारांचे हाल झाले. उद्धव ठाकरे यांनी त्यावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधत ही वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली होती. त्यावर नाराजी व्यक्त करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची शहानिशा करण्यासाठीच निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची दखल घेत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला असल्याची माहिती समोर येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List