मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसेवाटप; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसेवाटप; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

लोकसभा निवडणुकीत मिंधे गट आणि भाजपकडून धनशक्तीचा मोठय़ा प्रमाणात वापर केला गेला होता. आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्येही पैसे वाटप केले जात आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावात सभा झाली. सभेला उपस्थित शिक्षकांना त्या सभेनंतर पैसे वाटले गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर  त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तो व्हिडीओ आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर शेअर करत कुठे आहे निवडणूक आयोग, असा सवाल उपस्थित केला.

शिंदे यांची नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी शनिवारी जळगावमधील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. त्या सभेनंतर मिंधे गट शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;