रिक्षा चालकांचे आज राज्यभर आंदोलन; विलंब शुल्काच्या निर्णयाला विरोध
वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून उद्या राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षाचालक धडक देणार आहेत.
मुंबईसह राज्यात सुमारे 15 लाख रिक्षा चालक-मालक आहेत. रिक्षाच्या भाडय़ाचे दर, रिक्षा संचालनासंदर्भातील सर्व अटी व शर्ती राज्य सरकार ठरवते. कोरोना काळात केवळ 1500 रुपयांच्या मदतीशिवाय अन्य कोणतीही मदत सरकारने केली नाही. कोरोनानंतर रिक्षाचालकांना मोठया आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. अशातच वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून 50 रुपये प्रतिदिवस या प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलनाची हाक दिली आहे.
बस मालकांची याचिका फेटाळली
फिटनेस प्रमाणपत्राअभावी विलंब शुल्काची आकारणी होत असल्याने मुंबई बस मालक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2017मध्ये दाखल झालेली याचिका 2024 मध्ये फेटाळली. याचा आधार घेत 17 मे रोजी परिवहन आयुक्तांनी विलंब शुल्क आकारण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्वच वाहतूक संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List