शाळकरी मुलींचे लैंगिक शोषण करणाऱया शिक्षकाला दणका, पोक्सो कायद्यांतर्गत शिक्षेवर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब

शाळकरी मुलींचे लैंगिक शोषण करणाऱया शिक्षकाला दणका, पोक्सो कायद्यांतर्गत शिक्षेवर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब

रत्नागिरी जिह्यातील प्राथमिक शाळेतील नराधम शिक्षकाला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. शिक्षकाने तीन अल्पवयीन मुलींचे केलेले लैंगिक शोषणाचे कृत्य अत्यंत गंभीर आहे, असे मत नोंदवत न्यायमूर्ती किशोर संत यांनी आरोपी रमेश जाधवची पाच वर्षांची शिक्षा कायम ठेवली. जाधवला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दोषी ठरवले होते.

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2021 मध्ये रमेश जाधवने शिकवत असतानाच वर्गात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. यादरम्यान त्याने वर्गात मुलींना ठेवले आणि मुलांना वर्गाबाहेर पाठवले होते. याप्रकरणी पोलिसांनी 24 डिसेंबर 2021 रोजी जाधवविरुद्ध भारतीय दंड संहितेसह ‘पोक्सो’ कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. नंतर आरोपपत्र दाखल करून खटला चालवण्यात आला. खटल्यादरम्यान पीडित मुलींपैकी एका मुलीच्या आईने नराधम जाधवच्या कृत्याबद्दल मुलींनी सांगितलेल्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने साक्ष दिली होती. त्याआधारे अतिरिक्त  सत्र न्यायाधीशांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी जाधवला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला जाधवने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, तक्रारदार महिलेची साक्ष, पीडित मुलींनी नोंदवलेला जबाब व इतर पुरावे विश्वासार्ह मानत न्यायमूर्ती संत यांनी जाधवची शिक्षा कायम ठेवली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;