मुंबई महानगरपालिकेला भर पावसाळय़ात पूरमुक्तीची आठवण

मुंबई महानगरपालिकेला भर पावसाळय़ात पूरमुक्तीची आठवण

मुंबईत पाऊस दाखल झाला तरी मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व कामे अपूर्णच आहेत. ही कामे झाल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी नालेसफाई, कचरा, राडारोडा याच्याबाबतच्या तक्रारी सुरूच आहेत. त्यात आता पावसाचे पाणी तुंबू नये, परिसर पूरमुक्त व्हावा यासाठी बॉक्स ड्रेनचे मजबुतीकरण करण्याची आठवण पालिका प्रशासनाला झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रेतील बॉक्स ड्रेनचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे, तर बोरिवली स्थानक परिसरात पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी नवीन बॉक्स ड्रेनचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली असून यासाठी 16 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

मुंबईत दरवर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस बरसतो. या वर्षी दोन दिवस आधीच म्हणजे 9 जूनला पावसाचे आगमन झाले. पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. पावसाळय़ात मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ नये, रस्ते आणि रेल्वे मार्गावरील वाहतूक बाधित होऊन जनजीवन ठप्प होऊ नये यासाठी महापालिकेकडून 100 टक्के नालेसफाईवर भर दिला जातो. यंदाही महापालिकेने सर्व नाल्यांतील 100 टक्के गाळ उपसा पूर्ण केल्याचा दावा केला आहे. मात्र, हा दावा पोकळ निघाला आहे.

 जून महिना संपताना आली जाग 

महापालिकेला यावेळी नालेसफाई जमलीच नाही, पण मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या स्थानक परिसरातील गटारे, नाल्यांची साफसफाईही करता आलेली नाही. स्थानक परिसरातील रस्त्यावर तुंबणाऱया पाण्याचा वेळीच निचरा व्हावा यासाठी बॉक्स ड्रेनचे काम भरपावसाळय़ात हाती घेण्यात आले आहे. जून महिना संपत आला असताना महापालिकेला हा शहाणपणा सुचल्यामुळे रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

 इथे होणार बॉक्स ड्रेनचे मजबुतीकरण

अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, वांद्रे पूर्व येथील शिवाजीनगर कॉलनी येथे पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी बॉक्स ड्रेनचे काम हाती घेण्यात येणार आहे तसेच बोरिवली स्थानक परिसरात पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी पाणी वाहून नेण्यासाठी नवीन बॉक्स ड्रेनचे काम करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;