गणेशमूर्ती विसर्जनासाठी तलावांची साफसफाई, स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया राबवणार

गणेशमूर्ती विसर्जनासाठी तलावांची साफसफाई, स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया राबवणार

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरीत आतापासून लगबग सुरू झाली आहे तर बाप्पाच्या स्वागतासह विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी मुंबई महापालिकेने तलावांतील गाळ काढणे, साफसफाई करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी मुंबई महापालिका निविदा प्रक्रिया राबवणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात 7  सप्टेंबरला लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. देशविदेशात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. देशात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. गणेशोत्सवात दहा दिवस मुंबापुरी उजळून निघते. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे.

स्वच्छतेसाठी 98 लाखांचा खर्च

बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई महापालिकेकडून तयारी सुरू असताना विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करणे, नैसर्गिक तलावातील गाळ उपसा करणे, साफसफाई करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुलुंड पूर्वेकडील मोरया तलाव, गणेश घाट तलाव व भोईर तलावातील गाळ उपसा करणे व साफसफाईचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका तब्बल 98 लाख 13 हजार 720 रुपये खर्च करणार आहे. पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली असून पात्र पंत्राटदाराला काम देण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;