बिहारमध्ये डबल इंजिनची कमाल! आठ दिवसांत तीन पूल कोसळले

बिहारमध्ये डबल इंजिनची कमाल! आठ दिवसांत तीन पूल कोसळले

बिहारमध्ये आठवडाभरात पूल कोसळण्याची तिसरी घटना घडली. मोतिहारीमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. दोन कोटी रुपये खर्चून त्याचे बांधकाम सुरू होते. याआधी अररिया आणि सिवानमध्ये पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बिहारमधील सार्वजनिक कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पूर्व चंपारणच्या मोतिहारीच्या घोरासहन ब्लॉकमधील चैनपूर स्टेशनकडे जाणाऱया मार्गावर शनिवारी पूल कोसळला. पुलाची लांबी अंदाजे 50 फूट होती. पुलाच्या कास्टिंगचे काम झाले होते.

सिवानमध्ये जीवितहानी नाही

n बिहारच्या सिवानमध्येही शनिवारी गावांना जोडणारा छोटा पूल कोसळला. हा दारौंडा आणि महाराजगंज ब्लॉकमधील गावांना जोडणारा पूल आहे.

n जिल्हा दंडाधिकारी मुकुल कुमार गुप्ता यांनी सांगितले की,  या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. प्रथमदर्शनी असे दिसतेय की, कालव्यातून पाणी सोडले जात असताना खांब कोसळले.

अररिया दुर्घटनेची चौकशी सुरू

मंगळवारी अररिया जिह्यात नवीन बांधलेला अंदाजे 180 मीटर लांबीचा पूल कोसळला. अररिया पुलाच्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱयांवर ग्रामीण बांधकाम विभागाने विभागीय कारवाई सुरू केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;