श्रीरामपूर तालुक्यात 2250 किलो गोवंशीय मांस जप्त; 4,50,100 रुपयांचा मुद्देमला जप्त, 3 जणांना अटक

श्रीरामपूर तालुक्यात 2250 किलो गोवंशीय मांस जप्त; 4,50,100 रुपयांचा मुद्देमला जप्त, 3 जणांना अटक

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात 2250 किलो गोवंशीय जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस जप्त करण्यात आले आहे. साहित्यासह एकूण 4,50,100 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे. हबाज आयाज कुरेशी , अरबाज आयाज कुरेशी, फयाज आयास कुरेशी या तिघांना अटक करण्यात आली आहे. अदनान मेहबुब कुरेशी, रोहबाज मेहमुद कुरेशी,आरबाज मेहमुद कुरेशी, शाहिद मुश्ताक कुरेशी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर हारुण अब्दुलनबी कुरेशी हा आरोपी फरार आहे.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, हारुन अब्दुलनबी कुरेशी (रा. मिलत्तनगर वार्ड नं.01, श्रीरामपूर) त्याच्या घराच्या कंपाउंडमध्ये काहीजण गोवंशिय जनावरांची कत्तल करत आहेत. खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस पथकाने, पंच व पशु वैदयकीय अधिकाऱ्यांसह तेथे छापा टाकला. त्या ठिकाणी काहीजण गोवंशीय जनावराच्या मांसाचे तुकडे करताना आढळले. त्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एक आरोपी फरार आहे.

धाड टाकलेल्या ठिकाणाहून 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात कत्तल केलेल्या जनावरांचे मांस वजन अंदाजे 2250 किलो आणि लाकडी मुठ व धार असलेला सुरा यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;