छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवला IED स्फोट; CRPF चे दोन जवान शहीद
छत्तीगडमध्ये लष्कर, निमिलष्कर दल आणि पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे सीआरपीएफच्या वाहनाला लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात वाहनचालक आणि त्याचा सहकारी असे दोन जवान शहीद झाले आहेत. लष्कराने या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या ट्रकला उडवण्यासाठी आयईडी स्फोट घडवून आणला. जगरगुंडा भागातील कॅम्प सिल्गर येथून 201 कोब्रा कॉर्प्सची तुकडी टेकलगुडेम येथे जात होती. या ताफ्यात ट्रक आणि मोटारसायकलींचा समावेश होता. सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कॅम्प सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता. रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या मार्गावर ट्रक जाताच आयईडीचा स्फोट झाला आणि वाहनचालक आणि त्याचा सहकारी शहीद झाले. विष्णू आर आणि शैलेंद्र अशी शहीद जवानांची नावे आहेत.या स्फोटात काही सैनिक जखमी आहेत. नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी या परिसरात शोधमोहिम राबवण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List