मंदावलेला मॉन्सून सोमवारपासून जोर धरणार; जूनची तूट जुलैमध्ये भरुन काढणार

मंदावलेला मॉन्सून सोमवारपासून जोर धरणार; जूनची तूट जुलैमध्ये भरुन काढणार

यंदा मॉन्सूनने लवकर आगमन करत सुरवातीच्या आठवड्यात दमदार बॅटिंग केली. मात्र, त्यानंतर त्याचा वेग मंदावला होता. मंदावलेला मॉन्सून आता सोमवारपासून दमदार बरसणार असून जून महिन्यातील तूट तो जुलै महिन्यात भरून काढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी देखील पोषक वातावरण तयार झाले आहे. गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

यंदा देशामध्ये समाधानकारक सुमारे 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला आहे. तरीही अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. मात्र, आता सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात ‘ला निना’ सक्रिय होण्यास सुरवात होईल, त्यामुळे चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रात घाट माथ्यावर पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या परिसरामध्ये जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, कोकणसह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मॉन्सून 3 जूलैपर्यंत देशभरात पोहचण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात पावसाची जोरदार वाटचाल होणार आहे. पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये अद्याप मान्सूची प्रतीक्षा आहे. आता मॉन्सून मध्य भारताच्या पुढे पोहोचला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनला गती मिळणार आहे. त्यावेळी चांगला पाऊस होईल, तसेच जूनमध्ये कमी झालेल्या पावसाची जुलैमध्ये भरपाई होईल,असा अंदाज हवामान खात्याने वरत्वला आहे. पुढील तीन ते चार दिवसात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमधील काही भाग, बिहारचा काही भाग आणि उत्तर प्रदेशातून पुढे जाईल. या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 27 जून नंतर उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये ला नीना विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच जुलै आणि ऑगस्टमध्ये दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;