T20 World Cup 2024 : विराट कोहलीने रचला इतिहास, वर्ल्ड कपमध्ये असा विक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

T20 World Cup 2024 : विराट कोहलीने रचला इतिहास, वर्ल्ड कपमध्ये असा विक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला अद्याप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सुर गवसलेला नाही. असे असले तरी विराट कोहलीने सुपर 8 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळताना फक्त 37 धावा करत इतिहास रचला आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये (वन डे आणि टी20) असा विक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुपर 8 मध्ये आपल्या दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव करत सेमी फायनलचे तिकीट पक्के केले आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फंलदाजी करताना 196 धावा करत बांग्लादेशला 197 धावांचे आव्हान दिले होते. मात्र बांग्लादेशचे फलंदाज बुमराह आणि कुलदीपच्या जाळ्यात अडकले आणि बांग्लादेशचा 50 धावांनी पराभव झाला. या विजयामुळे टीम इंडियाचे सेमी फायनयलचे तिकीट जवळपास निश्चित झाले आहे. तसेच या सामन्यात विराट कोहलीने एतिहासीक कामगिरी केली आहे.

बांग्लादेशविरुद्ध सलामीला आलेल्या विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. विराट फक्त 37 धावा करुन बाद झाला. मात्र या 37 धावांमुळे विराट कोहली वर्ल्ड कपमध्ये (वन डे आणि टी20) 3000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा (2637 धावा), तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर (2502 धावा), चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर (2278 धावा), पाचव्या क्रमांकावर कुमार संगकारा (2193 धावा), सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे शाकिब अल हसन (2174 धावा) आणि क्रिस गेल (2151 धावा) यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;