सलमान खान याच्यापासून ते संजय लीला भन्साळीपर्यंत ‘हे’ सेलिब्रिटी पोहोचणार सोनाक्षी आणि झहीरच्या पार्टीला..
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. सात वर्ष सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांनी एकमेकांना डेट केलंय. आज सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर हे सिव्हिल मॅरेज करत आहेत. म्हणजेच काय तर हिंदू किंवा मुस्लिम पद्धतीने यांचे लग्न होणार नाहीये. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. आज रात्री एका मोठ्या पार्टीचे आयोजनही करण्यात आलंय. सोनाक्षी सिन्हा हिचे काही वेळापूर्वीच काही खास फोटो व्हायरल होताना दिसले. यावेळी सोनाक्षी सिन्हा ही मेकअपसाठी जात असल्याचे सांगितले गेले.
सोनाक्षी सिन्हा 23 जूनला लग्न करणार असल्याचे कळाल्यापासून विविध चर्चा या रंगताना दिसल्या. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या निर्णयावर तिचे कुटुंबिय आनंदी नसल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केले की, मुलीच्या लग्नात सर्वात आनंदी मीच असेल. तिच्या प्रत्येक निर्णयात मी तिच्यासोबत असेल.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नानंतर आता संध्याकाळी पार्टी आहे. विशेष म्हणजे या पार्टीसाठी अनेक बॉलिवूड कलाकार पोहचणार आहेत. सलमान खान या पार्टीला हजर असणार आहे. झहीर इक्बाल याचे वडील आणि सलमान खान यांचे खास नाते आहे. सलमान खानच्या वाईट काळात सोनाक्षीचे सासरे सलमान खानसोबत होते.
यामुळे सलमान खान या पार्टीला हजर असणार आहे. यासोबतच संजय लीला भन्साळी , अक्षय कुमार, आयुष शर्मा, हुमा कुरेशी, वरूण शर्मा, ताहा शाह, अनुपम खेर हे या पार्टीत सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे ही पार्टी अत्यंत खास असल्याचेही सांगितले जातंय. चाहते सोनाक्षी सिन्हा हिला शुभेच्छा देताना देखील दिसत आहेत.
लग्नाच्या जवळपास सर्वच विधी पार पडल्या आहेत. सोनाक्षी सिन्हा ही आई वडिलांसोबत खास पूजा करताना देखील दिसली. सोनाक्षी सिन्हा हिच्या मेंहदीच्या कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. सोनाक्षी सिन्हा हिची मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List