Munjya : 30 कोटी बजेटच्या ‘मुंज्या’ने कमावला तब्बल इतक्या कोटींचा नफा
अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेला 'मुंज्या' हा चित्रपट या वर्षातील पहिला सुपरहिट चित्रपट ठरतोय. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने गेल्या 16 वर्षांत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.
आश्चर्याची बाब म्हणजे 'मुंज्या' प्रदर्शित होण्याआधी त्याची काहीच चर्चा नव्हती. मात्र प्रदर्शनानंतर 'माऊथ पब्लिसिटी'चा त्याला मोठा फायदा झाला. सोशल मीडियावर त्याची इतकी चर्चा झाली की थिएटरकडे अधिकाधिक प्रेक्षकवर्ग आपसूकच आकर्षित झाला.
प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 'मुंज्या'ने 5.80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आतापर्यंत कमाईचा आकडा 80.11 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही कमाई येत्या काही दिवसांत 100 कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List