दोन पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात पोहोचला युट्यूबर; कोणासोबत शेअर करणार बेड? म्हणाला..
प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकने त्याच्या दोन पत्नी पायल आणि कृतिकासोबत 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये भाग घेतला आहे. बिग बॉसच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत रोमान्स करताना दिसला. त्याने पायल आणि कृतिकासोबतच्या नात्याबद्दल बरेच खुलासेसुद्धा केले आहेत.
'बिग बॉस ओटीटी 3'चे सूत्रसंचालक अनिल कपूर यांनी अरमान मलिकसोबत बरीच मस्करी केली. इथे लोकांना एक पत्नी सांभाळली जात नाही आणि तू दोन लग्न केलेस, असं ते त्याला म्हणाले. यानंतर अनिल कपूर हे अरमानसोबत एक खेळ खेळले.
हा खेळ खेळताना अनिल कपूर यांनी अरमानला काही मजेशीर प्रश्न विचारले. या प्रश्नांचं उत्तर देताना अरमानला त्याच्या दोन्ही पत्नींपैकी एकीचं नाव घ्यायचं होतं. अरमानला विचारलं गेलं की, तो शोमध्ये कोणासोबत बेड शेअर करणार?
अनिल कपूर यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना अरमानने त्याची पहिली पत्नी पायल मलिकचं नाव घेतलं. पायलचं नाव घेत अरमान म्हणाला की त्याची दुसरी पत्नी कृतिकापेक्षा पायल जास्त रोमँटिक आहे.
यानंतर अरमानला विचारलं गेलं की त्याला पायल आणि कृतिका यांच्यापैकी कोणाला विजेता होताना पहायचंय? या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने दुसरी पत्नी कृतिकाचं नाव घेतलं. कृतिकाचं मन फार स्वच्छ आणि कोमल असल्याने तिने हा शो जिंकावा अशी माझी इच्छा आहे, असं अरमान म्हणाला.
अरमानला कोणासोबत फिरायला आवडतं, या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने पहिली पत्नी पायलचं नाव घेतलं. त्यानंतर दोन्ही पत्नींपैकी सर्वाधिक ईर्षा कोणामध्ये आहे, असं विचारलं असता त्याने पायलचंच नाव घेतलं.
तू सर्वाधिक कोणत्या पत्नीचं ऐकतोस, असा प्रश्न विचारल्यावर अरमानने दुसरी पत्नी कृतिकाचं नाव घेतलं. तर दोन्ही पत्नींपैकी खोटं कोण अत्यंत सफाईदारपणे बोलतं, असं विचारल्यावर अरमानने पहिली पत्नी पायलचं नाव घेतलं. त्याचप्रमाणे सर्वाधिक खर्च कोण करतं, या प्रश्नाचं उत्तर देतानाही त्याने पहिल्या पत्नीचंच नाव घेतलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List