रेखा यांना वडिलांकडून कधीच नाही मिळाला लेकीचा दर्जा, खंत व्यक्त करत म्हणाल्या, ‘वडील म्हणून त्यांनी…’
प्रत्येक बाप – लेकीचं नात फार खास असतं. मुलीला कोणती गोष्ट हवी – नको हे प्रत्येक वडिलांना कळत असतं. शिवाय मुलीवर कोणतंही संकट आलं, तर तिच्यासोबत खंबीरपणे उभा असतो तो म्हणजे बाप… पण प्रत्येक मुलीच्या वाट्याला वडिलांचं प्रेम नसतं. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांच्या वाट्याला देखील वडिलांचं प्रेम कधी आलंच नाही. रेखा यांच्या वडिलांनी कधीच रेखा यांना मुलीचा दर्जा आण वडिलांचं प्रेम दिलं नाही. रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, प्रोफेशनल आयुष्यात रेखा यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहोचल्या, पण त्यांना खासगी आयुष्यात चढ उतारांचा सामना करावा लागला.
रेखा यांचे सिनेमे, रिलेशनशिपबद्दल अनेकां माहिती आहे. पण त्यांच्या आई-वडिलांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रेखा यांच्या वडिलांचा नाव जेमिनी गणेशन होतं. तर रेखा यांच्या आईचं नाव पुष्पावल्ली होते. दोघे देखील तामिळ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी होते.
जेमिनी गणेशन यांनी कधीच रेखा यांचा स्वीकार मुलगी म्हणून केला नाही. शिवाय रेखा यांच्या आई पुष्पावल्ली यांच्यासोबत कधी लग्न देखील केलं नाही.जेमिनी गणेशन यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच रेखा आणि त्यांच्या आईचा कुटुंब म्हणून स्वीकार केला नाही.
वडिलांनी मुलगी म्हणून स्वीकार केला नाही म्हणून रेखा देखील वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचल्या नव्हत्या. 2005 मध्ये रेखा यांच्या वडिलांचं निधन झालं. दरम्यान वडिलांसोबत असलेल्या नात्यावर रेखा यांनी मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं.
वडिलांबद्दल काय म्हणाल्या होत्या रेखा
एका मुलाखतीत रेखा यांनी वडिलांसोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला होता. ‘त्यांच्या निधनानंतर मी दुःख का व्यक्त करु. त्यांच्या आयुष्यात माझ्यासाठी कोणतंच स्थान नव्हतं. वडील म्हणून माझ्या आयुष्यात त्यांचं काहीही योगदान नाही. त्यांच्यासोबत मी एकही क्षण घालवला नाही यासाठी मला आनंद आहे. ते फक्त माझ्या कल्पनांमध्ये सामील होते… वडील म्हणून त्यांनी काहीही केलं नाही…’ असं रेखा म्हणाल्या होत्या.
रेखा यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘मिस्टर नटवरलाल’, ‘नागिन’, ‘लज्जा’, ‘सिलसिला’, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री रेखा यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण रेखा यांना आई – वडिलांचं कधी एकत्र प्रेम मिळालं नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List