मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रात बेईमानीचा स्ट्राईक रेट जास्त आहे, संजय राऊत यांची बोचरी टीका

मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रात बेईमानीचा स्ट्राईक रेट जास्त आहे, संजय राऊत यांची बोचरी टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूकी महायुतीचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ”महाराष्ट्रात मुख्यमंत्र्‍यांच्या बेईमानीचा स्ट्राईकरेट जास्त चांगला असल्याची’, टीका संजय राऊत यांनी केली आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी मिंधे, भाजप व निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

”मुख्यमंत्र्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रात चांगला आहे. पैशांनी स्ट्राईक रेट विकत घेता येतात. ते त्यांनी केले. आमच्या काही जागा हातातोंडाशी आलेल्या होत्या. उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर यांनी दरोडा घातला. हा तुमच्या खोक्यांच्या स्ट्राईक रेट आहे. जनतेचा स्ट्राईक रेट नाही. देशभरात शंभरापेक्षा जास्त जागा या पाचशे ते हजारच्या फरकाने भाजपने जिंकलेल्या आहेत. तिथे दबाव आणून विजय मिळवलाय भाजपने. धुळ्याची जागा विजयी घोषीत करावी अशा प्रकारचा दबाव केंद्रातून सतत होता. सात ईव्हीएम मशीनची मतगणना बाकी असताना अशा प्रकारचा दबाव केंद्रातील वरिष्ठ सत्ताधाऱ्यांनी टाकला. या सगळ्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई करायला हवी. ज्या दिवशी सरकार कोसळेल तेव्हा पहिली कारवाई ही निवडणूक आयोगावर करू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;