शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शिक्षक व पदवीधर मतदारसंघात मिंधे गटाकडून केल्या जाणाऱ्या पैसेवाटपावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी ”शेअर बाजारात होणाऱ्या खरेदी विक्री प्रमाणे शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी नाशिक शिक्षक मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. त्याविषयी पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं. ”मुख्यमंत्री नाशिकमध्ये कशाला आले होते ते सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्राला शिक्षणाची शिक्षकी पेशाची फार मोठी परंपरा आहे. असं असताना मुख्यमंत्री शिक्षकी पेशाला, शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजार प्रमाणे तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसत आहे. शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील त्यामुळे तुम्ही त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला महाराष्ट्राच्या संस्कृतीची संस्काराची परंपरेची जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभं करू नका. या थरापर्यंत खाली पडू नका”, असे संजय राऊत म्हणाले.

नाशिक शिक्षक मतदारसंघात मुख्यमंत्र्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा व्हिडीओ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शेअर केला आहे. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ”मला खात्री आहे पैसे वाटप होत आहे. सुषमा अंधारे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. लोकसभा निवडणूकीत नाशिकमध्ये् 20 कोटी रुपये कसे उतरवले ते सगळ्यांनी बघितले. पदवीधर, शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना बाजारात उभं करू नका. या सगळ्याला जबाबदार निवडणूक आयोग आहे. व्याभिचाराने उघड्या डोळ्याने लोकशाहीची हत्या निवडणूक आयोग पाहतोय. निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे पट्टी बांधून बसले आहेत व त्याला गाठ मोदी व शहांनी बांधली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;