स्तनपान करणाऱ्या आईला..; फूड ब्लॉगरवर का भडकली स्वरा भास्कर?

स्तनपान करणाऱ्या आईला..; फूड ब्लॉगरवर का भडकली स्वरा भास्कर?

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा एक्स (ट्विटर) अकाऊंटवर सक्रिय झाली आहे. बकरी ईदच्या दिवशी शाकाहाराबद्दल पोस्ट लिहिणाऱ्या एका आहारतज्ज्ञावर तिने निशाणा साधला होता. त्यानंतर या दोघींमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक चकमक सुरू झाली. आता त्याच आहारतज्ज्ञाने स्वराला तिच्या वाढलेल्या वजनावरून हिणवलं आहे. त्यावर अभिनेत्रीने तिला सडेतोड उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर या दोघींमधील वाद चर्चेत आला आहे.

आहारतज्ज्ञ आणि फूड ब्लॉगरने स्वराचा आधीचा आणि आताचा फोटो कोलाज करून एक्सवर पोस्ट केला. त्यावर तिने लिहिलं, ‘तिने काय खाल्लं?’ त्यावर स्वराने तिला उत्तर दिलं, ‘तिने मूल जन्माला घातलंय आणि तुम्ही यापेक्षा चांगलं काहीतरी काम करा, नलिनी.’ स्वराच्या या उत्तरावर फूड ब्लॉगरने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटलं, ‘मी माझं चांगलंच काम करत होते. पण माझ्या शाकाहारी पोस्टवर द्वेष पसरवून तू माझ्या मार्गात आलीस. मी नियमितपणे शाकाहाराचा प्रचार करते आणि ती पोस्टसुद्धा त्याचाच भाग होता. तुझ्या प्रतिक्रियेमुळे तो धर्माचा मुद्दा बनला, यामुळेच मी तेव्हा तुला उत्तर दिलं नव्हतं.’

‘तुझ्या खाण्यापिण्याच्या निवडी तुझ्या स्वत:च्या आहे आणि माझी त्यात काहीच हरकत नाही. पण मीसुद्धा शाकाहाराचा प्रचार करण्यास मोकळी आहे. होय मी शाकाहारी आहे आणि मला माहित आहे की डेअरी (दूध आणि दुग्धजन्य पदार्थ) पदार्थ खाण्यातही क्रूरत आहे. मी ज्यादिवशी विगन (शाकाहारीसोबतच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ न खाणारे) होईन तेव्हा मला स्वत:चा अधिक अभिमान वाटेल. तुझ्या पोस्टने हा जातीय मुद्दा बनला आणि तुझा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे कृपया अशा टिप्पण्या करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा. तुझ्या शब्दांचा समाजावर परिणाम होऊ शकतो आणि माझ्यासारख्या लोकांसाठी त्याचा खूप त्रास होऊ शकतो. तुझा फोटो टाकून मी चुकले, हे मान्य करते. तो फोटो मी लवकरच हटवेन. पण घाबरू नकोस, तुझ्या चुका स्वीकार आणि माझ्यावरील द्वेष दूर कर’, असं तिने स्वरासाठी लिहिलं.

फूड ब्लॉगरच्या या पोस्टवर स्वरानेही प्रत्युत्तर दिलंय. ‘या मुद्द्याकडे नीट लक्ष देऊयात. बकरी ईच्या दिवशी मुस्लिमांना टार्गेट करण्याच्या हेतूने तू शाकाहाराबद्दलची पोस्ट लिहिली होतीस, म्हणून मी आवाज उठवला. ठीक आहे. पण माझ्यासोबत शाकाहाराच्या मुद्द्यावरून भिडण्यापेक्षा तू स्तनपान करणाऱ्या आईच्या वाढलेल्या वजनावरून बॉडीशेम केलंस. तू खरंच आहारतज्ज्ञ आहेस का?’, असा सवाल स्वराने केला आहे.

स्वरा आणि फूड ब्लॉगरमधील ही शाब्दिक चकमक सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. स्वराला वाढलेल्या वजनावरून ट्रोल केल्याने नेटकऱ्यांनीही संबंधित फूड ब्लॉगरवर नाराजी व्यक्त केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;