प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक, तरुणाचा केला लैंगिक छळ

प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक, तरुणाचा केला लैंगिक छळ

सेक्स स्कँडल प्रकरणात अटक झालेला जेडीएसचा माजी निलंबीत खासदार व माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा याचा सख्खा भाऊ सुरज रेवण्णालाही आता अटक करण्यात आली आहे. जेडीएसच्या एका कार्यकर्त्यांने सुरजवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर सुरजला अटक करण्यात आली आहे. हासन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील पोलीस ठाण्यात सुरजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज रेवण्णा याने पीडित कार्यकर्त्याला त्यांच्या फार्महाऊसवर बोलावून त्याचा लैंगिक छळ केला. त्यानंतर त्याला मारहाणही केली. या प्रकरणी पीडित तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 377 अंतर्गत अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला.

सुरजने मला एकदा त्याच्या फार्महाऊसवर बोलावून माझ्यासोबत जबरदस्ती केली. त्यानंतर त्याने मला राजकारणात माझे करिअर सेट करण्याचे आश्वासन मला दिले होते,असे त्या तरुणाने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;