पुसेसावळी दंगल प्रकरणात भाजपच्या पावसकरचा सहभाग? सखोल तपास करून अहवाल सादर करा, मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

पुसेसावळी दंगल प्रकरणात भाजपच्या पावसकरचा सहभाग? सखोल तपास करून अहवाल सादर करा, मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

जिह्यातील पुसेसावळी येथील घडलेल्या दंगल व हत्याकांडात भाजपचे पदाधिकारी विक्रम पावसकर यांचा सहभाग स्पष्ट करण्याकरिता कलम 174 (8) या अनुषंगाने पुढील तपास करून उच्च न्यायालयात सहा आठवडय़ांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी दिले आहेत.

सातारा पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात ईश्वरपूरचे काँग्रेसचे शाकीर तांबोळी यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

पावसकर यांनी जिह्यातील किकिध ठिकाणी प्रामुख्याने खटाक तालुक्यातील औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाती-जातीमध्ये तणाक निर्माण होईल क मुस्लिमांच्या विरोधात द्वेषपूर्ण अशी भाषणे केली होती. त्या विरोधात शाकीर तांबोळी तसेच विविध संघटना, कार्यकर्ते यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनास विक्रम पावसकर यांच्या विरोधात वेळोवेळी गुन्हे दाखल करण्याबाबत निवेदने दिली होती.

औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसेसावळी येथील मुस्लिम युककाचा खून तसेच पुसेसावळी येथील सार्वजनिक व खासगी मालमत्तेची जाळपोळ याविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. भारतीय दंडसंहिता कलम 153, 295 अ अन्वये गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले होते. गुन्हे दाखल झाले; परंतु राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत होते. विक्रम पावसकर यांच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. त्यामुळेच शाकीर इसालाल तांबोळी यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात हाय कोर्टात याचिका दाखल केली होती.

सांगली जिह्यातील विटा व ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुह्यांमध्ये आरोपपत्र तयार असून, पुढील कारवाई शासन मंजुरीसाठी प्रलंबित आहे, असे सांगली पोलिसांनी उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले होते. त्याच अनुषंगाने पुढील कारवाईकरिता सरकारी वकील एच. एस. केणेगाककर यांनी उच्च न्यायालयास चार आठवडय़ांच्या मुदतीची विनंती केली असता, उच्च न्यायालयाने ती मान्य करून चार आठवडय़ांमध्ये शासनमंजुरी घेऊन न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विक्रम पावसकर यांच्या हस्तक्षेप अर्जाच्या अनुषंगाने ऍड. डॉ. अभिनक चंद्रचूड व यशोधन देशमुख हे बाजू मांडत आहेत. तर, शाकीर इसालाल तांबोळी यांच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ मिहीर देसाई आणि श्रीमती संस्कृती याज्ञिक या काम पाहत आहेत. सरकारच्या वतीने एच. एस. केणेगाककर व सहायक वकील श्रीमती पी. पी. शिंदे या काम पाहत आहेत.

एसआयटीमार्फत फेरतपासाची मागणी

n पुसेसावळी येथे घडलेल्या हत्याकांडाचा तपास हा पूर्णपणे राजकीय दबावाखाली एकतर्फी झाला असून, यामध्ये गुन्हेगार मोकाट सुटले आहेत व पुराव्यांशीसुद्धा छेडछाड झाली आहे. त्यामध्ये सातारा पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या हत्याकांडाच्या फेरतपासासाठी एसआयटी लावण्याची मागणी उच्च न्यायालयामध्ये करीत आहोत, असे शाकीर तांबोळी यांनी या संदर्भात सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;