Sonakhsi Sinha : सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची जय्यत तयारी, वधूच्या आउटफिटचा फोटोही समोर, कोणता लेहंगा घालणार सोनाक्षी ?

Sonakhsi Sinha : सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची जय्यत तयारी, वधूच्या आउटफिटचा फोटोही समोर, कोणता लेहंगा घालणार सोनाक्षी ?

बॉलिवूडची ‘दबंग’ स्टार आणि नामवंत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या आयुष्यातील आज महत्वपूर्ण दिवस आहे. आज सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न असून ते रजिस्टर मॅरेज करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबाकडून बऱ्याच प्रतिक्रिया समोर आल्या असून या नव्या जोडप्यासाठी सर्वांनीच शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाक्षी आणि जहीर हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मेहंदी आणि इतर प्री-वेडिंग फंक्शन्सनंतर हे जोडपं आज, अर्थात 23 जूनला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. जहीरचे वडील राजा झहीर यांनीही हे रजिस्टर मॅरेज असल्याच्या वृ्त्ताला दुजोरा दिला.

म्हणजेच सोनाक्षी सिन्हा धर्म न बदलता झहीर इक्बालशी कायदेशीर विवाह करणार आहे. सोनाक्षी आणि जहीर यांच्या संपूर्ण कुटुंबासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी, त्यांची मित्र-मंडळीदेखील त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार आहेत. आज सकाळी या दोघांचं रजिस्टर मॅरेज होईल त्यानंतर संध्याकाळी मोठं सेलीब्रेशन होणार असल्याचं समजतं. सोनाक्षी सर्वांसमोर नववधूच्या वेशात दिसणार आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचा लग्नाचा पोशाख सर्वात खास असतो, सगळ्यांच्या नजरा तिच्या पोशाखावर असतात.

वेडिंग आऊटफिटचे फोटो व्हायरल

पण सोनाक्षी-झहीरच्या लग्नाआधीच त्यांचे आउटफिट्स कसे असतील खुलासा झाला आहे. खरंतर, सोशल मीडियावर काही फोटोज तसेच व्हिडीओ समोर आले आहे. रामायण, या सोनाक्षीच्या घराबाहेरील हे फोटो असून काही लको कारमधून अनेक आऊटफिट्स काढताना दिसत आहेत. त्यामध्ये पीच रंगाचा एक लेहंगादेखील आहे. तोच सोनाक्षीचा लग्नातील आऊटफिट असल्याची चर्चा आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आईसोबत सोनाक्षीने केली पूजा

त्यामुळे लग्नाच्या खास दिवशी सोनाक्षी ही लाल रंगाचा नव्हे तर पीच कलरचा लेहंगा घालणार आहे, अशी चर्चा आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये सोनाक्षी तिच्या आईसोबत प्री-वेडिंग फंक्श्नसमध्ये सभागी होताना तसेच पूजा करताना दिसली. लग्नानंतर सोनाक्षी-जहीर, या जोडप्याचा पहिला फोटो, पहिली झलक पाहण्यासाठी सर्वच आतुर आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;